भारताने सामना जिंकला आणि एका क्रिकेट शौकीनाने चक्क पेढे वाटून नवस फेडले

कळे ( प्रतिनिधी ) : चॅम्पियन ट्रॉफी 2025 भारत विरुध्द न्यूझीलंड हा रविवार दि. 9 रोजी. ऐतिहासिक क्रिकेटचा सामना झाला. जगाचे लक्ष वेधून घेणारा आणि उत्कंठा वाढवणारा हा सामना होता. भारताने मोठ्या शिताफीने आणि आपले कौशल्य दाखवून हा सामना जिंकला. भारत वासियांनी आनंदोत्सव साजरा केला. काहींचा आपल्या भारतीय संघावर विश्वास होता, तर काहींनी पैजा लावल्या… Continue reading भारताने सामना जिंकला आणि एका क्रिकेट शौकीनाने चक्क पेढे वाटून नवस फेडले

शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त तसेच विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे वनक्षेत्रपाल कडगाव यांना निवेदन

कडगाव-पाटगाव ( प्रतिनिधी ) : एक तर जीवावर बेतून रात्रंदिवस करावी लागणारी शेतीची राखण आणि त्यात वन्य प्राण्यांमुळे शेतीचे होणारे मोठे नुकसान आणि मिळणारी शासनाकडून तटपुंजी मदत या सर्वाला कंटाळून अखेर कडगाव तालुका भुदरगड येथील शेतकऱ्यांनी कडगाव वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांना वन्य प्राण्यांचा बंदोबस्त तसेच विविध मागण्यांसाठी निवेदन दिले. वन्य प्राण्यांकडून झालेली नुकसान भरपाई म्हणून… Continue reading शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त तसेच विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे वनक्षेत्रपाल कडगाव यांना निवेदन

स्व. विनायकराव क्षीरसागर यांच्या प्रथम स्मृतिदिनी अभिनव उपक्रम..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : आमदार राजेश क्षीरसागर यांचे वडिल आणि कोल्हापूर जिल्हा बेकर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष स्व. विनायकराव क्षीरसागर यांच्या प्रथम स्मृतिदिनी आज उत्तरेश्वर पेठ परिसरातील मस्कुती तलाव तरुण मंडळाच्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला. सर्वसामान्य लोकांसोबत कायम नाळ बांधून ठेवलेल्या आणि गरजूंच्या मदतीसाठी सदैव अग्रेसर असणाऱ्या स्व. विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर यांच्या स्मृतिदिनी मंडळाच्या सदस्यांनी… Continue reading स्व. विनायकराव क्षीरसागर यांच्या प्रथम स्मृतिदिनी अभिनव उपक्रम..!

‘टेक्नोवा’ सारख्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना : उद्योजक सारंग जाधव

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : टेक्नोवा सारख्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळेल,असे प्रतिपादन सीआयआयचे दक्षिण महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष उद्योजक सारंग जाधव यांनी केले. डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक येथे आयोजित टेक्नोवा 2025 या तांत्रिक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 560 विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते. सारंग जाधव पुढे म्हणाले,… Continue reading ‘टेक्नोवा’ सारख्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना : उद्योजक सारंग जाधव

गोरगरीबांच्या पोटातील होळीला पुरणपोळीचा नैवेद्य, वाकरेतील सलग 28 वर्षे अभिनव उपक्रम.

कळे ( प्रतिनिधी ) : वाकरे येथील ग्रामदैवत श्री.जोतिबा देवालयासमोर पूर्वीपासून सामुदायिक आणि सार्वजनिक होळी पेटवण्याची परंपरा आहे. त्यासाठी गावातून गोवऱ्या जमा करून होळी पेटवली जाते. त्यानंतर नारळ, पुरणपोळी आणि भाताचा नैवेद्य होळीला अर्पण केला जात होता. पुरणपोळी, नारळ आणि भाताची नासाडी होणारी पाहून कुंभी बँकेचे संचालक, स.ब.खाडे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त.प्रा.एस.पी.चौगले यांनी शिवाजी चौगले, विजय माळी… Continue reading गोरगरीबांच्या पोटातील होळीला पुरणपोळीचा नैवेद्य, वाकरेतील सलग 28 वर्षे अभिनव उपक्रम.

भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असताना मलकापूर येथील जवानाला आले वीरमरण

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शाहुवाडी तालुक्यातील शित्तूरचे रहिवासी जवान सुनिल विठ्ठल गुजर (वय 27 ) हे भारतीय सैन्य दलात 2019 मध्ये भरती झाले होते. पुणे येथे बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुपमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून मणिपूर येथे 110 बॉम्बे इंजीनियरिंग रेजिमेंटमध्ये सेवा बजावत होते. गेल्या अशी दिवसापासून मणिपूर येथे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना सैन्यदलाचे वाहन 800… Continue reading भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असताना मलकापूर येथील जवानाला आले वीरमरण

वाकुर्डे बुद्रुक योजनेतील विविध प्रश्ना संदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न..

सांगली ( प्रतिनिधी ) : वाकुर्डे बुद्रुक योजनेतील विविध प्रश्नसंदर्भात मंत्रालय येथे राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते. वाकुर्डे बुद्रुक योजनेमधील रेड कालव्याची गळती प्रतिबंधक कामांची प्रशासकीय मान्यता घेण्यासाठीचा प्रस्ताव शासनास सादर करावा तसेच सदर… Continue reading वाकुर्डे बुद्रुक योजनेतील विविध प्रश्ना संदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न..

महायुती सरकारचा अर्थसंकल्पात धनगर समाजावर अन्याय का ..? : आण्णासाहेब डांगे

मुंबई ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्रातील अत्यंत मागासलेल्या आणि राज्यातील लक्षणीय लोकसंख्या असलेला धनगर समाज आणि तत्सम संबंधित बाबींकडे शासनाचे संपूर्ण दुर्लक्ष असणारा हा दुर्दैवी अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी ज्येष्ट मंत्री, धनगर समाज महासंघाचे संस्थापक, मार्गदर्शक डॉ. आण्णासाहेब डांगे यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्ताने देशभर त्यांच्या कर्तुत्वाचे गुणगान होत… Continue reading महायुती सरकारचा अर्थसंकल्पात धनगर समाजावर अन्याय का ..? : आण्णासाहेब डांगे

महिलांनी मासिक पाळी विषयी जनजागृती करणे काळाची गरज : श्रद्धा डांगरे

कळे ( प्रतिनिधी ) : आजकाल शालेय जीवनापासून मुलींच्या शारीरिक आणि मानसिक बदल समजावून देण्याची गरज निर्माण झाली असून महिलांनी मासिक पाळी विषयी मनात संकोच न करता जनजागृती करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सातारा येथील वुईरिमोर कंपनीच्या डिस्ट्रीब्यूटर आणि प्लॅटिनम डायरेक्टर श्रद्धा डांगरे यांनी केले.  गगनभरारी फौंडेशन, कोल्हापूर आणि शिवशंभो उद्योग समूह कळे… Continue reading महिलांनी मासिक पाळी विषयी जनजागृती करणे काळाची गरज : श्रद्धा डांगरे

कळे येथे प्राथमिक शिक्षकांसाठी शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण

कळे ( प्रतिनिधी ) : कळे येथील केंद्रशाळा कुमार-कन्या विद्या मंदिर शाळेमध्ये जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्यावतीने पन्हाळा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.  पन्हाळा गटशिक्षणाधिकारी संदीप यादव, शा.पो.आ.अधिक्षक शिवाजी मानकर, केंद्रप्रमुख भगवान चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांना भविष्यातील शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व येणाऱ्या संधींचा उपयोग करून घेण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले… Continue reading कळे येथे प्राथमिक शिक्षकांसाठी शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण

error: Content is protected !!