कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील निकमवाडी (ता. पन्हाळा) येथील रहिवासी कृष्णात खोत यांच्या “रिंगाण” या कादंबरीला जाहीर झाला आहे. देशातील 24 भाषेत प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर केला जातो. यामध्ये मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार रिंगाण या कादंबरीला मिळाला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार साहित्य क्षेत्रात साहित्य अकादमी पुरस्कार हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तो पुरस्कार रिंगाणला मिळाला आहे. कृष्णात खोत हे रिंगाण या कादंबरीचे लेखक आहेत. त्यांनी त्यांच्या या कादंबरीमध्ये विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण केलं आहे.

दरम्यान साहित्य क्षेत्रातील साहित्य अकादमी पुरस्कार हा अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. त्याच पुरस्कारने कृष्णात खोत यांना त्यांच्या रिंगाण या कादंबरीसाठी गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण 12 मार्च 2024 रोजी करण्यात येणार आहे.

साहित्य अकादमीची स्थापना कधी झाली ?

साहित्य अकादमीची स्थापना 1954 मध्ये भारतीय भाषांमधील साहित्य आणि साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली. त्याचे पहिले अध्यक्ष तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते. त्याचवेळी अध्यक्ष सर्वपल्ली राधाकृष्णन, अबुल कलाम आझाद, झाकीर हुसेन, उमाशंकर जोशी, महादेवी वर्मा आणि रामधारी सिंग दिनकर हे पहिल्या परिषदेचे सदस्य होते.