शाहू महाराज छत्रपतींना संपुर्ण पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील कोल्हापूर लोकसभा जागेसाठी काँग्रेसने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना संधी दिली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा करत शाहू महाराज छत्रपतींना संपुर्ण पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे. शाहू महाराज यांनी लोकसभेच्या रिंगणामध्ये या निर्णयामुळे विजयाच्या दशेने आणखी एक पाऊल पुढे आले आहेत अशी… Continue reading शाहू महाराज छत्रपतींना संपुर्ण पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाची निवडणूक आयोगात धाव..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी निवडणूक आयोगाची भेट घेऊन काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्याबद्दल तक्रार केली. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यावेळी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर केलेली पोस्ट अत्यंत आक्षेपार्ह असून त्यांनी ती पोस्ट काढून टाकण्याची… Continue reading राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाची निवडणूक आयोगात धाव..!

सांगलीत कोण घेणार नमते ? विश्वजीत कदम की चंद्रहार पाटील; फैसला उद्याच ?

सांगली ( प्रतिनिधी ) महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेसाठीच्या उमेदवारीवरुन सुरु असलेली रस्सीखेच अद्याप संपलेली नाही. सांगलीची जागा उद्धवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावावर करणार असल्याचं म्हटले आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम यांनी प्रसंगी टोकाची भुमिका घेऊ असं म्हटल्याने ही जागा कोणाच्या पदरात पडणार ? असा सवाल विचारला जात आहे.… Continue reading सांगलीत कोण घेणार नमते ? विश्वजीत कदम की चंद्रहार पाटील; फैसला उद्याच ?

लाईव्ह मराठी विशेष: भाजप प्रवेश ह्या केवळ अफवाच; प्रणिती शिंदेनी स्पष्ट केली भुमिका

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) देशातील लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजले असताना, राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे ह्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आता जोर धरु लागल्या आहे. लाईव्ह मराठीने याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांच्यांशी संपर्क करत भाजपमध्ये प्रवेशाबाबत चर्चा केली असता त्यांनी माझा भाजप प्रवेश ही केवळ अफवा असल्याचं… Continue reading लाईव्ह मराठी विशेष: भाजप प्रवेश ह्या केवळ अफवाच; प्रणिती शिंदेनी स्पष्ट केली भुमिका

महाराष्ट्रात वंचितचा काँग्रेसला 7 जागांवर पाठींबा ; प्रकाश आंबेडकरांचे खर्गेंना पत्र

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर राज्यात निवडणुकीचे पडघम वाजलेत. राज्यात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. वंचितच्या सतत बदलणाऱ्या भूमिका आणि जास्त जागांची मागणी यामुळे महाविकास आघाडीने वंचितचा विचार सोडून वंचितविना निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. यातच वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना… Continue reading महाराष्ट्रात वंचितचा काँग्रेसला 7 जागांवर पाठींबा ; प्रकाश आंबेडकरांचे खर्गेंना पत्र

मोदीभक्त देशभक्त नाहीत का?; उद्धव ठाकरेंचा पलटवार

मुंबई/प्रतिनिधी : मुंबईत काल भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा झाली. यावेळी देशातील दिग्गज नेते या सभेला उपस्थित होते. मुंबईत कार्यक्रम असल्याने उद्धव ठाकरेंनीही आवर्जुन हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाषणाची सुरुवात हिंदू बांधवांनो-भगिनींनो न म्हणत केली. यावरून विरोधकांनी ठाकरे यांना लक्ष करत टीका केली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी काल (१७ मार्च)शिवाजी पार्कात राहुल… Continue reading मोदीभक्त देशभक्त नाहीत का?; उद्धव ठाकरेंचा पलटवार

‘लोकसभे’पूर्वी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; 6 राज्य गृहसचिव हटवले

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सार्वत्रिक निवडणुकीची पहिली अधिसूचना जारी करण्यापूर्वी निवडणूक आयोगाने आज मोठी कारवाई केली आहे. आयोगाने 6 राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचे आदेश जारी केले आहेत. याशिवाय पश्चिम बंगालच्या डीजीपींना हटवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताना निवडणूक आयोग निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलणार असल्याचे सांगितले होते. मुख्य… Continue reading ‘लोकसभे’पूर्वी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; 6 राज्य गृहसचिव हटवले

निवडणूक आयोगानं बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना हटवलं

मुंबई/प्रतिनिधी : बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना केंद्रीय निवडणूक आयोगाने हटवलं आहे. निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांतील सचिवांना हटवले आहे. लोकसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याबरोबर मिझोराम… Continue reading निवडणूक आयोगानं बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना हटवलं

सांगली लोकसभेच्या उमेदवारीवर दादा घराण्याचा अबोला…

जयंत पाटील, विश्वजित कदम विशाल पाटलांना पाठबळ देणार की संजय पाटलांना मदत करणार सांगली/प्रतिनिधी : सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा अद्याप कायम आहे. या जागेवर शिवसेना ठाकरे गट आणि कॉंग्रेस आग्रही आहे. शिवसेनेने कोल्हापूरची जागा कॉंग्रेसला दिल्याने ठाकरे गटाकडून सांगलीच्या जागेवर दावा सांगितला जात आहे. तर कॉंग्रेस नेते आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत… Continue reading सांगली लोकसभेच्या उमेदवारीवर दादा घराण्याचा अबोला…

सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे : जिल्हाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी 7 मे रोजी मतदान होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. तर कालपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुका शांततेत पार पाडाव्यात या दृष्टीने सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा… Continue reading सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे : जिल्हाधिकारी किशोर तावडे

error: Content is protected !!