कोल्हापूर ( प्रतिनिधी ) देशातील लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजले असताना, राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे ह्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आता जोर धरु लागल्या आहे. लाईव्ह मराठीने याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांच्यांशी संपर्क करत भाजपमध्ये प्रवेशाबाबत चर्चा केली असता त्यांनी माझा भाजप प्रवेश ही केवळ अफवा असल्याचं म्हटलं आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपने ऑफर दिल्याचं म्हटलं असल्यानं या चर्चा आता जोर धरु लागल्या आहेत. सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलं आहे की, सोलापूरच्या जागेवर प्रणिती शिंदे यांना घेण्यासाठी भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केला.

भाजपवाले पक्षात प्रवेश करा म्हणत येतात. मात्र आम्ही आमच्या मनात स्ट्रॉंग आहोत, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. या स्थितीवर प्रणिती शिंदे यांनी आपण काँग्रेसच्या प्रचारात व्यस्त असून, अशी कोणतीही भुमिका आपण घेणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे शिंदे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला आहे.