कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील कोल्हापूर लोकसभा जागेसाठी काँग्रेसने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना संधी दिली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा करत शाहू महाराज छत्रपतींना संपुर्ण पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे.

शाहू महाराज यांनी लोकसभेच्या रिंगणामध्ये या निर्णयामुळे विजयाच्या दशेने आणखी एक पाऊल पुढे आले आहेत अशी चर्चा आता रंगू लागली आहे. प्रकाश आंबेडकरांनी आज पत्रकार परिषद घेत शाहू महाराजांना पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. असं असलं तरी प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीबाबत आपला निर्णय अद्याप घेतलेला नाही.

मात्र काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याची भूमिका वंचित आघाडीने घेतली होती. याबाबत बोलताना आंबेडकर यांनी काँग्रेसने त्या जागा सांगाव्यात यानंतर आम्ही पाठिंबा दर्शवणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे इतर बाबतीत अद्याप साशंकता असली तरी कोल्हापूर लोकसभेबाबतचा आपला निर्णय आज स्पष्ट केला आहे.