रांगोळीमध्ये सर्व अर्ज वैध; तिरंगी लढतीचे चित्र

रांगोळी (प्रतिनिधी) : येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण १५ जागांसाठी ६५ व सरपंच पदासाठी ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आज उमेदवारी अर्ज छाननी वेळी कोणीही हरकत घेतली नसल्यामुळे सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले. या निवडणुकीमुळे डिसेंबरच्या गुलाबी थंडीत राजकीय गरमागरम चर्चांनी रंगत आणली आहे. हातकणंगले तालुक्यातील राजकीय व आंदोलनाचा केंद्रबिंदू अशी ओळख असणारे गाव… Continue reading रांगोळीमध्ये सर्व अर्ज वैध; तिरंगी लढतीचे चित्र

टोप, कासारवाडी, संभापूर, नागावमधील सर्व अर्ज वैध

टोप (प्रतिनिधी) : टोप, संभापूर, कासारवाडी, अंबप, नागाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराला सुरवातही झाली आहे. यापूर्वी अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज हातकणंगले येथे दाखल केले होते. आज सोमवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. यामध्ये टोप (सरपंचपदासाठी ५, सदस्य ४३),  कासारवाडी (सरपंच- १६, सदस्य- ३३), संभापूर (सरपंच- ४ सदस्य ३८),  नागाव (सरपंच- ९, सदस्य ७१) या गावांतील… Continue reading टोप, कासारवाडी, संभापूर, नागावमधील सर्व अर्ज वैध

गगनबावडा तालुक्यात सरपंचपदासाठी ८१ उमेदवार रिंगणात

गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील २१ ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत जुळवाजुळवीच्या राजकारणामुळे काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नामनिर्देशन दाखल करण्यासाठी गगनबावडा तालुक्यातील तहसील कार्यालयात तोबा गर्दी झाली. नामनिर्देशन दाखल करण्यासाठी महिलादेखील मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. गगनबावडा तालुक्यात सरपंचपदासाठी एकूण ८१, तर सदस्यपदासाठी ३०० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तालुक्यात… Continue reading गगनबावडा तालुक्यात सरपंचपदासाठी ८१ उमेदवार रिंगणात

राशिवडे ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता

राशिवडे (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील सर्वात मोठे आणि तालुक्याचा राजकीय केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राशिवडे ग्रामपंचायतीमध्ये सदस्य निवडीसाठी तिरंगी लढती होतील, असा रागरंग आहे. शिवाय सरपंचपदासाठी तीन महिला उमेदवार रिंगणात उतरणार असल्याने यातही तिरंगी लढत चुरशीची पाहावयास मिळणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता यावर्षी ग्रा.पं. निवडणुकीसाठी इच्छुकांची तोबा गर्दी झालेली दिसून येत आहे. यंदा पुन्हा भोगावती… Continue reading राशिवडे ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता

धामोड, कोते, चांदे, खामकरवाडीमध्ये दुरंगी लढतीची शक्यता

धामोड (प्रतिनिधी) : धामोड परिसरातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत दुरंगी लढती होतील, असे सध्याचे चित्र आहे. यामध्ये धामोड, कोते, चांदे, आपटाळ, खामकरवाडी ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी लढतीमुळे कमालीची चुरस पाहावयास मिळणार आहे. लोकसभा, विधानसभा तसेच जिल्हा पातळीवरील प्रत्येक निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राधानगरी तालुक्यातील तुळशी परिसरामधील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून मतदान होणार की समझोता होऊन बिनविरोध निवडी होणार… Continue reading धामोड, कोते, चांदे, खामकरवाडीमध्ये दुरंगी लढतीची शक्यता

अकिवाटमध्ये विकासकामांमुळे विशाल चौगुले गटाचे पारडे जड

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : अकिवाट ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे गावात राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी विशाल चौगुले गटाने चांगलीच व्यूहरचना आखली आहे. अशातच अनेक मातब्बर त्यांच्या बरोबर असल्याने विशाल चौगुले यांचा गट अकिवाटमध्ये जोरात आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विशाल चौगुले यांनी ग्रामपंचायतीची सत्ता काबीज केली होती आणि स्वतः सरपंच म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी… Continue reading अकिवाटमध्ये विकासकामांमुळे विशाल चौगुले गटाचे पारडे जड

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन अर्ज भरण्यास मुभा

मुंबई (प्रतिनिधी) : विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र घेण्यास सुरुवात झाली आहे; मात्र तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन अर्ज भरण्यास वेळ लागत आहे. यामुळे पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.… Continue reading ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन अर्ज भरण्यास मुभा

सून भाजपकडून रिंगणात, सासरा काँग्रेसच्या बाजूने

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : गुजरात विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार मंगळवारी सायंकाळी संपला, पण गुजरात विधानसभा निवडणुकीचा विषय आला की रवींद्र जडेजाच्या कुटुंबाचे नाव समोर येत आहे. क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या घरी सध्या कौटुंबिक युद्ध सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे, तर दुसरीकडे त्याची बहीण काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रचार करत… Continue reading सून भाजपकडून रिंगणात, सासरा काँग्रेसच्या बाजूने

शिरोळ तालुक्यात पहिल्या दिवशी सरपंचपदासाठी ६ अर्ज

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून गावा- गावातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. आज सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी सरपंचपदासाठी ६ अर्ज, तर सदस्यपदासाठी ४ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी चांगल्या दिवसाबरोबरच मुहूर्त शोधण्यासाठी धडपड सुरू केली असल्याचे दिसते. येत्या २ डिसेंबर हा अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस… Continue reading शिरोळ तालुक्यात पहिल्या दिवशी सरपंचपदासाठी ६ अर्ज

पन्हाळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २९ अर्ज

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील ५० ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी सहा गावांतून सदस्यपदासाठी २९, तर सरपंचपदासाठी पाच गावांतून आठ अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसीलदार रमेश शेंडगे यांनी दिली. यवलूज, जाखले, काखे, माले, राक्षी, कोतोली गावातील काहीं उमेदवारांनी सदस्यपदासाठी २९ अर्ज दाखल केले आहेत. राक्षी गाव वगळता पाच गावांनी सरपंचपदासाठी देखील अर्ज दाखल… Continue reading पन्हाळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २९ अर्ज

error: Content is protected !!