पन्हाळा ( प्रतिनिधी ) पावनगड येथील तटाच्या कड्यावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला असून यामध्ये मुलगा वय वर्ष (२२) राहणार राशिवडे व मुलगी वय वर्ष (२१) राहणार राशिवडे येथील असून ते गंभीर जखमी झाले आहेत.


चार च्या सुमारास पावनगड येथील दर्गा जवळच असलेल्या कड्यावरून जवळपास 30 फुटाच्या खोल तटावरून त्यांनी उडी घेतली. ही घटना पावनगड येथील रहिवासी असलेल्या स्थानिकांनी पाहिल्यानंतर पन्हाळा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

या खोल दरीत घेतली जोडीनं उडी…!

घटनास्थळी पन्हाळा पोलिसांनी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने त्यांना दरीतून वर काढून पन्हाळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी कोल्हापूर सीपीआर येथे नेण्यात आले आहे. यावेळी पन्हाळा पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब मुलगुंडे, विलास जाधव, सचिन पाटील, विकास केरलीकर, सचिन वायदंडे, यांनी मोलाचे सहकार्य केले.