कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूरचा शाही दसरा हा राज्य शासनाने ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केला आहे. यानिमित्ताने जिल्हा प्रशासनाच्यावतीने यावर्षी पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, तसेच विविध स्पर्धां मध्ये खेळाडू व संबंधीतांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य सरकारमार्फेत करण्यात आले आहे.


राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसा या महोत्सवाचे नियोजन पुढील प्रमाणे आहे.


रविवार दिनांक १५/१०/२०२३ घट स्थापना

पर्यटन परिचय केंद्र व पर्यटन प्रदर्शन उद्घाटन- जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचे महत्व व माहिती देणारे प्रदर्शन व कायम स्वरुपी माहिती केंद्र सुरु होत आहे. पागा बिल्डिंग, जुना राजवाडा, भवानी मंडप परिसर, कोल्हापूर


सोमवार दिनांक १६/१०/२०२३


जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये , विविध संस्थां मध्ये पारंपरिक वेशभुषा दिवस
(संपूर्ण जिल्ह्यात यापुढे नवरात्रीचा दुसरा दिवस हा पारंपरिक वेशभूषेत साजरा करावयाचा आहे. )


दुपारी 4 वाजता
जुना राजवाडा ते दसरा चौक *कलाकारांची शोभा यात्रा
( शिवाजी विद्यापीठ , युवा महोत्सव विजेते संघ)

सायंकाळी 6 वाजता *दसरा चौक रंगमंच
सांस्कृतिक कार्यक्रम (शिवाजी विद्यापीठ, युवा महोत्सव विजेते संघ)

मंगळवार दिनांक १७/१०/२०२३


सायंकाळी 6 ते 9 दसरा चौक रंगमंच
सांस्कृतिक कार्यक्रम
सिनेतारकांचा ‘नवदुर्गा’ हा नृत्य- नाट्य कार्यक्रम

बुधवार दिनांक १८/१०/२०२३


सायंकाळी 6 ते 9 दसरा चौक रंगमंच
मुलांसाठी ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक
सांस्कृतिक कार्यक्रम

गुरुवार दिनांक १९/१०/२०२३ टेंबलाई यात्रा


सकाळी 8 ते 10 वाजता शोभायात्रा
टेंबलाई मंदिराकडे जाणाऱ्या देवीच्या पालखी पुढे दुचाकी वरुन महिलांच्या विविध गटांचे मार्गक्रमण होईल. घोषवाक्य , प्रबोधनपर फलक, थीम यासह विद्यार्थिनी , शिक्षक , वकील , डॉकटर , परिचारिका , इंजिनियर , आधिकारी , महिला पोलिस, होमगार्ड कर्मचाऱ्यांचा सहभाग.


फक्त महिला सहभागी


मार्ग : दसरा चौक ते भवानी मंडप ते बिंदू चौक ते उमा टॉकीज ते बागल चौक ते टाकळा ते उड्डाण पुल ते ताराराणी चौक ते दाभोलकर कॉर्नर ते राजाराम पुतळा ते दसरा चौक.

भारतीय युद्धकला स्पर्धा


देशात विविध प्रकारचे पारंपरिक युद्ध प्रकारांचे सराव करणारे खेळाडू आहेत. कोल्हापूर शहरात मर्दानी खेळाची परंपरा आहे. या कौशल्यपूर्ण क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन मिळावे व परिचय व्हावा, यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सायंकाळी 5 वाजता युद्धकला खेळाडूंची शोभायात्रा

सायंकाळी 6 वाजता, दसरा चौक रंगमंच
सांस्कृतिक कार्यक्रम
दसरा चौक रंगमंच-
कोल्हापूर ही ज्यांची कर्मभूमी राहिली ते शाहीर दादा कोंडके यांच्या कलाकृतीवर आधारित कलाविषकार

शुक्रवार दिनांक २०/१०/२०२३


भारतीय युद्धकला स्पर्धा
प्राथमिक व द्वतिय फेरी, छत्रपती शिवाजी स्टेडियम
सायंकाळी 6 वाजता, सांस्कृतिक कार्यक्रम * दसरा चौक रंगमंच
‘करुन गेला गाव’ हे भाऊ कदम, ओंकार भोजने यांचा सहभाग असलेले नाटक

शनिवार दिनांक २१/१०/२०२३


भारतीय युद्धकला स्पर्धा
अंतिम फेरी व बक्षीस वितरण
छत्रपती शिवाजी स्टेडियम
सायंकाळी सहा वाजता
सांस्कृतिक कार्यक्रम
दसरा चौक रंगमंच
संगीत फ्युजन


रविवार दिनांक २२/१०/२०२३

हॅपी स्ट्रीट
जुने खेळ, आट्या पाट्या, गलोर, गोट्या, भोवरा, गाणी, चित्र, मार्शल आर्ट, मर्दानी खेळ, गो कारटिंग, महिलांसाठी लेझिम- दसरा चौक ते जयंती पुल रस्ता
सकाळी 8 ते 10 वाजता
इंस्टोलेशन स्पर्धा ( मांडणं शिल्प ) (दिनांक २२ ते २४ / १० / २०२३ )
खानविलकर पेट्रोल पंप ते महावीर कॉलेज मार्ग दरम्यान.
भारतीय संस्कृती / लोककला यावर आधारित मांडण शिल्प हे कागद ,कापड , बांबू , गवत , माती, क्ले ,रंग व टाकावू वस्तू यांच्या पासून दहा फूट उंच , दहा फूट लांब , पाच फूट रुंद आकाराची ही मांडण शिल्प कलाकारांच्या स्पर्धेद्वारा मांडली जातील.
गालिचा रांगोळी स्पर्धा (दुपारी 2 ते सायंकाळी 6)
श्री महालक्ष्मी – अंबाबाई देवीची नगर प्रदक्षिणा मार्गावर
( सायंकाळी सहा वाजता नागरिकांसाठी खुले )

सोमवार दिनांक २३/ १०/ २०२३


राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्तृत्ववान ठरलेल्या कोल्हापुरच्या यशस्वी महिलांचा सन्मान
सायंकाळी 6 वाजता, स्थळ : केशवराव भोसले नाट्यगृह / शाहू स्मारक भवन


मंगळवार दिनांक २४/१०/२०२३


सायंकाळी 4 वाजता
जुना राजवाडा ते दसरा चौक मार्गावर *ढोल ताशा पथक, लेझिम पथक, मावळा पथक आदीं कडून पालखीचे स्वागत
नामवंत खेळाडूंचा लवाजाम्या मध्ये समावेश
नवा राजवाडा ते दसरा चौक.
नवा राजवाडा ते दसरा चौक
जिल्हा परिषद व शहरातील माध्यमिक शाळा ,महाविद्यालये , एन एस एस, एन सी सी आदीं ची विविध पथके, लेझिम व अन्य प्रदर्शनीय खेळ यांचे प्रत्यक्षिक सादर करीत श्रीमंत छत्रपती यांचे स्वागत करतील. बुलेट रायडर चे पथक श्रीमंत छत्रपती यांचे वाहनाचे पुढे मार्गक्रमण करेल..