टोप ( प्रतिनिधी ) राज्यात झालेल्या सत्तेच्या घडामोडींमुळे राज्याच्या चांगल्या योजना दुर्लक्षित राहिल्या होत्या. या योजना मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्यापर्यंत पोहचवण्याचे काम अंबपमधील माने कुटुंबाने केले आहे. असे प्रतिपादन जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी केले. ते अंबप येथील संजय गांधी निराधार योजनेच्या आदेश वाटपावेळी बोलत होते.


यावेळी परिसरातील 250 लाभार्थ्यांना योजनेचे आदेश वाटप माजी जि. प. सदस्या मनिषा माने, सरपंच दीप्ती माने यांनी केले. मागील तीन वर्षांपासून मतदार संघातील 50 पेक्षा अधिक रिक्षाचालकांना पाच लाखांचा संरक्षण असलेला विमा मोफत उतरवला जातो.

यावेळी विमानतळ प्राधिकरणाचे सदस्य विकास माने, हातकणंगलेचे अप्पर तहसीलदार महेश खिलारे टोपचे सरपंच तानाजी पाटील, कासारवाडीचे सरपंच अच्युत खोत, अंबपवाडीचे सरपंच पांडुरंग खोत, वाठारचे सरपंच तेजस्विनी वाठारकर, पाडळीच्या सरपंच विभावरी पाटील, भादोले सरपंच स्नेहा पाटील, मनपाडळे सरपंच रायबाराजे शिंदे, सर्व उपसरपंच, सदस्य व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन विनायक गुरव यांनी केले.