मोदी सरकारच्या कालावधीत किती सक्रिय होती ED ? छापेमारीची संपूर्ण आकडेवारी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) 2014 पूर्वी गेल्या 10 वर्षांत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) छाप्यांमध्ये मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत 86 पट वाढ झाली आहे. त्याच वेळी, मागील याच कालावधीच्या तुलनेत अटक आणि मालमत्ता जप्त करण्यात जवळपास 25 पट वाढ झाली आहे. जुलै 2005 ते मार्च 2024 दरम्यान उपलब्ध डेटाच्या विश्लेषणात या गोष्टी समोर आल्या आहेत. मनी लाँडरिंग… Continue reading मोदी सरकारच्या कालावधीत किती सक्रिय होती ED ? छापेमारीची संपूर्ण आकडेवारी

आचारसंहितेचा भंग करणाऱ्या एकनाथ शिंदे सेनेच्या सर्वांची उमेदवारी रद्द करा: अतुल लोंढे

मुंबई : लोकसभा निवडणूक प्रचार सुरु झाल्यापासून सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे व त्याबाबतची रितसर तक्रारही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. आता पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर बॅनर लावून बेकायदेशीरपणे शिवसेना पक्षाची जाहीरातबाजी करून आदर्श आचारसंहितेचा… Continue reading आचारसंहितेचा भंग करणाऱ्या एकनाथ शिंदे सेनेच्या सर्वांची उमेदवारी रद्द करा: अतुल लोंढे

समान नागरी कायदा म्हणजे आपल्या सर्वांचे आरक्षण संपुष्टात आणण्याचे कुटील कारस्थान : अनिल गोटे

धुळे : समान नागरी कायदा म्हणजे आपल्या सर्वांचे आरक्षण संपुष्टात आणण्याचे कुटील कारस्थान असल्याचा खळबळ जनक आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर देशभरातील शेतकऱ्यांची वाताहात लावली आहे. २०१४ मध्ये असलेल्या शेतमालाच्या भावाशिवाय सर्व वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत. केवळ शेतमालाचे भाव २०१४ मध्ये होते. त्यापेक्षा कमीच झाले… Continue reading समान नागरी कायदा म्हणजे आपल्या सर्वांचे आरक्षण संपुष्टात आणण्याचे कुटील कारस्थान : अनिल गोटे

राजमाता अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंहराजेंच्या हाती तुतारी, प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे तर देशाच्या राजकारणात शदर पवार यांना बेरजेच्या राजकारणासाठी ओळखले जाते. पक्षफुटीनंतरही मागील काही दिवसांपासून शरद पवार यांनी एकएक मोहरा जोडण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. अलीकडे त्यांच्या पक्षात अनेक मोठ्या नेत्यांनी प्रवेश करत पुन्हा एकदा ताकद दाखवली आहे. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशजांनीही तुतारी हाती घेतली आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर… Continue reading राजमाता अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंहराजेंच्या हाती तुतारी, प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी

मंडलिक आणि शाहू छत्रपती कुटुंब एकत्र…घडलं असं काही की…

कागल : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून संजय मंडलिक तर महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती रिंगणात उतरले आहेत.दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.यामुळं जिल्ह्यातील लोकसभेच वातावरण चांगलंच तापलं आहे. दोन्ही आघाडींच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. गेल्या आठवड्यात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज यांच्या दत्तक प्रकरणाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने एकच खळबळ… Continue reading मंडलिक आणि शाहू छत्रपती कुटुंब एकत्र…घडलं असं काही की…

महाराष्ट्र लोकसभा रणांगणात मित्र बनले शत्रू आणि शत्रू बनले मित्र

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणूकीपुर्वी काही महिने राजकीय उलथा पालथ घडल्या आणि जे मित्र गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचार करत होते तेच या निवडणुकीत शत्रू झाले आहेत आणि ज्यांना ते शत्रू म्हणायचे ते या निवडणुकीत मित्र म्हणून प्रचार करत आहेत. असे विलक्षण चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे उद्धव… Continue reading महाराष्ट्र लोकसभा रणांगणात मित्र बनले शत्रू आणि शत्रू बनले मित्र

महायुतीत तिढा नको म्हणून किरण सामंतांची माघार : मंत्री उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर महायुतीकडून भाजप आणि शिवसेनेनेही दावा केला होता. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी हा मतदार संघ शिवसेनेला मिळावा यासाठी आग्रह धरला होता. तर भाजपचे नेते नारायण राणे यांनीही कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार असे म्हणत प्रचाराला सुरुवात केली होती. अखेर आज पक्षानं नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली… Continue reading महायुतीत तिढा नको म्हणून किरण सामंतांची माघार : मंत्री उदय सामंत

33 महिने आम्ही काय सहन केलंय…आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले

सोलापूर:  33 महिने आम्ही काय सहन केलंय, हे आम्हाला माहित आहे.  देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती. महाविकास आघाडीच्या काळात तशी वेळ आली होती. त्यावेळी मी प्रदेशाध्यक्ष होतो. असं खळबळजनक वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवेढ्यातील एका सभेत बोलताना केलं. 33 महिने आम्ही काय सहन केलंय, हे आम्हाला माहित आहे.… Continue reading 33 महिने आम्ही काय सहन केलंय…आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले

‘चार दिवस सासूचे संपले’ वक्त्यव्यावर सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना थेट सवाल..!

बारामती – सध्या लोकसभा वारे वाहत आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत. या दरम्यान पवार कुटुंबियामधील संघर्ष पाहायला मिळत आहे. कोणीही एकमेकांवर निशाणा साधायची एक ही संधी सोडत नाही. अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यात लोकसभेच्या अनुषंगाने कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या… Continue reading ‘चार दिवस सासूचे संपले’ वक्त्यव्यावर सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना थेट सवाल..!

अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे ,रवींद्र धंगेकर आज करणार उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर आज गुरुवारी (१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने आज शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून शरद पवार यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या सभेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे… Continue reading अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे ,रवींद्र धंगेकर आज करणार उमेदवारी अर्ज दाखल

error: Content is protected !!