मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे तर देशाच्या राजकारणात शदर पवार यांना बेरजेच्या राजकारणासाठी ओळखले जाते. पक्षफुटीनंतरही मागील काही दिवसांपासून शरद पवार यांनी एकएक मोहरा जोडण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. अलीकडे त्यांच्या पक्षात अनेक मोठ्या नेत्यांनी प्रवेश करत पुन्हा एकदा ताकद दाखवली आहे. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशजांनीही तुतारी हाती घेतली आहे.

राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि मल्हारराव होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. पुण्यामध्ये आज महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रविंद्र धंगेकर यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर महाविकास आघाडीची रॅली झाली. या रॅलीमध्ये भूषणसिंहराजे होळकर यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. आगामी लोकसभा निवडणुकीत भूषणसिंह होळकर यांनी आपल्या हाती तुतारी घेतली आहे. भूषणसिंह होळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागली.

पुण्यामध्ये आज महायुतीच्या उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर महाविकास आघाडीची रॅली झाली. यावेळी महाविकास आघाडीतील अनेक प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. महाविकास आघाडीच्या या प्रचार रॅलीमध्येच भूषणसिंह होळकर यांनी आज शरद पवार गटामध्ये केला. भूषणसिंह होळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत देखील भूषणसिंह होळकर यांचा समावेश आहे.

भूषणसिंहराजे होळकर हे आधी भाजपसोबत होते. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची शरद पवारांसोबत जवळीक वाढली होती. भूषणसिंह यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील शरद पवार यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली होती. या भेटीपासूनच भूषणसिंह हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर आज त्यांनी महाविकास आघाडीच्या पुण्यातील रॅलीमध्ये तुतारी हाती घेत शरद पवार गटामध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. तर प्रवेशानंतर भूषणसिंहराजे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.