बारामती – सध्या लोकसभा वारे वाहत आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत. या दरम्यान पवार कुटुंबियामधील संघर्ष पाहायला मिळत आहे. कोणीही एकमेकांवर निशाणा साधायची एक ही संधी सोडत नाही. अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यात लोकसभेच्या अनुषंगाने कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या बाहेरच्या पवार या वक्तव्यावर बुधवारी चार दिवस सासूचे संपले, आता चार दिवस सुनेचे येऊ द्या, असे वक्तव्य केले होते. बारामतीमध्ये येऊन सुनेत्रा पवार यांना 40 वर्ष झाली तरी बाहेरचे म्हणत आहेत, असाही जोरदार टोला अजित पवार यांनी शरद पवार यांना लगावला होता. आता यावर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना सडेत्तोर उत्तर दिले आहे

काय म्हणाल्या सुप्रिया सुळें..?

पवारांच्या कुटुंबातील कोणत्या सासूने निवडणूक लढली. माझ्या आईला फोटो काढलेले ही आवडत नाही. माझी कोणती ही काकी अथवा आई (सासू) कधी राजकारणात आलेली नाही. आशा काकी, सुमिती काकी, भारती काकी आणि माझी आई अशी कोणतीही सासू राजकारणात आल्या नाही. या सर्व आपले खासगी जीवन जगल्या आहेत, पवार यांच्या घरण्यातील कोणती सासू निवडणूक लढवली? असा सवाल त्यांनी अजित पवारांना उपस्थित केला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागुंन राहिले आहे.