मंगळवेढा (प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम लोकप्रिय असे आमदार समाधान आवताडे यांच्या 47 व्या वाढदिवसानिमित्त आमदार जनसंपर्क कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबीरामध्ये 747 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जतन केली आहे. तसेच या वाढदिवसानिमित्त सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची नोंदणी व गावोगावी पशु आरोग्य तपासणी शिबिर आदी कार्यक्रमांनी उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आला.


असेच सामाजिक दायित्वाचे भान राखत आपण पाणीदार आमदार आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास भेट देऊन अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक दायित्व जपण्याकरिता आपला सहभाग नोंदवला. त्याचबरोबर या वाढदिवसाच्या औचित्य साधून सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची काही जोडप्यांनी नोंद करून या विवाह सोहळ्यात आपला विवाह करण्याचे निश्चित केले आहे.


यावेळी माजी पं. स सदस्य नवनाथ पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हा नियोजन समिती प्रदीप खांडेकर, माजी उपसभापती धनंजय पाटील, दत्तात्रय जमदाडे, व्हा चेअरमन अंबादास कुलकर्णी, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, संतोष मोगले, माजी संचालक सुरेश भाकरे, सचिन शिवशरण, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, भाजपा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, संचालक तानाजी काकडे, जगन्नाथ रेवे, माजी नगरसेवक कैलास कोळी.


दादासाहेब ओमणे, दादा दोलतोडे, भारत निकम, विजय माने, भारत आटकळे, न. पा. प्राथ. शिक्षण मंडळ सदस्य दिगंबर यादव, शाम पवार, कार्यकारी संचालक मोहन पिसे, सिद्धेश्वर दत्तु, युवराज शिंदे, राजकुमार यादव, सुधाकर मासाळ, विनायक यादव, सतिश पवार, शिवाजी पटाप, सुदर्शन यादव, जनार्धन कोंडुभैरी, सुरेश मेटकरी, समाधान हेंबाडे, साहेबराव उगाडे, दत्ता साबणे, आदी मान्यवर, विविध गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटी चेअरमन संचालक, एस एम अवताडे कन्स्ट्रक्शन कंपनी.

आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि, आवताडे स्पिनर्स प्रायव्हेट लिमिटेड या व्यावसायिक संकुलातील अधिकारी पदाधिकारी, कर्मचारी, खातेप्रमुख, आमदार जनसंपर्क कार्यालय पंढरपूर मंगळवेढा स्टाफ, ब्लड बँक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, दोन्ही तालुक्याच्या विविध गावातील ग्रामस्थ व नागरिक आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.