सोलापूर ( प्रतिनीधी ) अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे सोलापुरात जानेवारी महिन्यात 100 व्या विभागीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज या संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन अभिनेते भाऊ कदम आणि आमदार सुभाषबाबू यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, सोलापूरच्या वैभवाला साजेसे संमेलन व्हावे ही सर्व सोलापूरकरांची भावना आहे. यानुषंगाने, संमेलनासाठी निधी व अन्य कशाचीही कमतरता भासू देणार नाही, याबाबत यापूर्वीच आश्वस्त केले आहे. त्यामुळे सर्वांच्या मदतीने 100 वे विभागीय मराठी नाट्य संमेलन यशस्वी आणि भव्यदिव्य करु असे याप्रसंगी पाटील यांनी आश्वस्त केले. त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देखील त्यांनी याप्रसंगी दिली.

यावेळी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने, अखिल भारतीय उपनगरीय शाखेचे अध्यक्ष तथा नाट्यपरिषद मुंबईचे कार्यकारणी सदस्य विजय दादा साळुंके, नाट्य परिषद चे सहकार्यवाह दिलीप कोरके नियमक मंडळ सदस्य सुमित फुलमामडी, विश्वनाथ आव्हाड, प्रशांत बडवे, तेजस्विनी कदम, सोमेश्वर घाणेगावकर, मोहन डांगरे उपस्थित होते.