उत्तूरमध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने पालकमंत्र्यांचा सत्कार

उत्तुर ( प्रतिनिधी ) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल उत्तुर ता. आजरा येथे सत्कार करण्यात आला आहे. हा सत्कार सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आला. हा सकल मराठा समाजाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासह उपस्थितांनीही “एक मराठा- लाख मराठा…..” अशा जोरदार घोषणा दिल्या. मंत्री… Continue reading उत्तूरमध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने पालकमंत्र्यांचा सत्कार

अखेर सरकार नमले; मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य

मुंबई ( वृत्तसंस्था ) मराठा आरक्षणासाठी गेल्या तीन महिन्यांपासून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने सुरु आहेत. याला यश आले असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी माध्यमांना दिली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील नागरिकांनी आता आनंदोत्सव सुरु केला आहे. याबाब सकल कोल्हापूर सकल मराठा समाजाने दिलेल्या माहितीनुसार गत दोनवेळा शासनाकडून आरक्षणाची फसगत याचा पूर्वानुभव… Continue reading अखेर सरकार नमले; मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य

पुण्यात ‘जरांगें’च स्वागत ‘न भूतो न भविष्यती’; सरकारवर दबाव वाढला..!

पुणे ( प्रतिनिधी ) मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. ते मुंबईत पोहोचण्यास अवघे दोन दिवस उरले असताना पुण्यात जरांगे यांचं आगमन होताच त्यांना पाठींबी देण्यासाठी अभूतपूर्व गर्दी झाली होती. तसेच त्यांच्या पुण्यामधील सभेला सुद्धा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने गर्दी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे… Continue reading पुण्यात ‘जरांगें’च स्वागत ‘न भूतो न भविष्यती’; सरकारवर दबाव वाढला..!

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी आजपासून सर्वेक्षण सुरु

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मंगळवार (दि.23) पासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक गावात प्रगणक नियुक्त करण्यात आले आहेत, ते गावातील प्रत्येक घरात जाऊन एका प्रश्नावलीव्दारे माहिती भरून घेतील. माहिती देताना प्रत्येक व्यक्तीने काळजी पूर्वक उत्तरे द्यावीत. कारण या सर्वेक्षणाच्या आधारावरच पुढील निर्णय… Continue reading मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी आजपासून सर्वेक्षण सुरु

आम्हाला रोखले तर परिणाम वाईट होतील; जरांगेचा राज्य सरकारवर हल्लाबोल

जालना ( वृत्तसंस्था ) मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरंगे जालना ते मुंबई असा निषेध मोर्चा काढत आहेत. शनिवारी (20 जानेवारी) सुरू झालेला त्यांचा मोर्चा आज 22 जानेवारी अहमदनगरला पोहोचला. येथे त्यांनी महाराष्ट्र सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणी महाराष्ट्र सरकारला जाब विचारावा… Continue reading आम्हाला रोखले तर परिणाम वाईट होतील; जरांगेचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मराठा आरक्षण: जरांगेंचा ‘शेवटच्या श्वासापर्यंत’ लढण्याचा संकल्प

पुणे ( वृत्तसंस्था ) मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरंगे यांनी शनिवारी हजारो लोकांसह महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातून मुंबई निषेध मोर्चा काढला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी निषेध मोर्चा सुरु केला आहे. मोर्चा सुरू करण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना जरंगे यांनी सरकारची क्रूर आणि असंवेदनशील वृत्ती आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याची टीका केली.… Continue reading मराठा आरक्षण: जरांगेंचा ‘शेवटच्या श्वासापर्यंत’ लढण्याचा संकल्प

नोंदीनुसार मराठ्यांना तात्काळ जातप्रमाणपत्र द्या; राज्य शासनाचे जिल्हाधिकार्‍यांना आदेश

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतलेले मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलक हे 20 जानेवारी रोजी मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. त्यामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आढळलेल्या कुणबी नोंदींनुसार संबंधित व्यक्तींना तत्काळ जातप्रमाणपत्र द्या असे आदेश राज्य शासनाने सर्व दिले असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जरांगे यांनी अद्याप कुणबी… Continue reading नोंदीनुसार मराठ्यांना तात्काळ जातप्रमाणपत्र द्या; राज्य शासनाचे जिल्हाधिकार्‍यांना आदेश

मराठ्यांनो आता थांबायचं नाही..! जरांगे आंदोलनावर ठाम

जालना ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. २१ जानेवारी रोजी सर्व मराठ्यांनी आंतरवाली सराटीमध्ये जमा व्हावे, आपल्याला मुंबईकडे रवाना व्हायचं आहे. यादिवशी कोणकोणते नेते येतात हे पाहायचं आहे. असं ही ते यावेळी म्हणाले.राज्य शासनाबाबत तक्रार… Continue reading मराठ्यांनो आता थांबायचं नाही..! जरांगे आंदोलनावर ठाम

10 लाख वाहने होणार मुंबईकडे रवाना; मनोज जरांगे यांचा ‘हा’ आहे मास्टर प्लॅन

पुणे ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारविरोधात आंदोलन करण्याची तयारी केली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी तिसऱ्यांदा उपोषण सुरू करत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी 20 जानेवारीला 10 लाख वाहने मुंबईकडे रवाना होतील. त्या वाहनांमध्ये आंदोलकांना लागणाऱ्या वस्तू असतील असं ही म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार… Continue reading 10 लाख वाहने होणार मुंबईकडे रवाना; मनोज जरांगे यांचा ‘हा’ आहे मास्टर प्लॅन

हातकणंगले, शिरोळमध्ये चार हजारावर कुणबी नोंदी; खासदार मानेंनी घेतली आढावा बैठक

टोप ( प्रतिनीधी ) सध्या राज्यात कुणबी शोध मोहिम सुरू असून महसुल, शिक्षण, व इतर विभागांच्यावतीने युद्ध पातळीवर नोंदी शोधण्याचे काम चालू आहे. हातकणंगले शिरोळ तालुक्यातून कुणीही वंचीत राहू नये यासाठी प्रशासनाने मराठी व मोडी लिपीमध्ये उपलब्ध नोंदी पहाव्यात असे खासदार धैर्यशिल माने यांनी म्हटले आहे. सध्या हातकणंगले व शिरोळमधून अनुक्रमे 2 लाख 52 हजार… Continue reading हातकणंगले, शिरोळमध्ये चार हजारावर कुणबी नोंदी; खासदार मानेंनी घेतली आढावा बैठक

error: Content is protected !!