धक्कादायक..! कुत्र्यांच्या हल्ल्यात वाघ बकरी चहा ग्रुप कार्यकारी संचालकांचा गेला बळी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) गुजरातमध्ये टी प्रोसेसर्स अँड पॅकर्सचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे निधन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कुत्र्याच्या हल्ल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पराग देसाई हे लोकप्रिय वाघ बकरी ब्रँड चहासाठी ओळखले जात होते. अहमदाबाद येथे त्यांचे निधन झाले. गेल्या आठवड्यात पराग देसाई (50 ) मॉर्निंग वॉकसाठी बाहेर… Continue reading धक्कादायक..! कुत्र्यांच्या हल्ल्यात वाघ बकरी चहा ग्रुप कार्यकारी संचालकांचा गेला बळी

पैसे घेतल्याच्या आरोपावर खासदार मोईत्रांचा जबरी पलटवार; मी कधीही, कुठेही***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले असल्याचा गंभीर आरोप उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी केला आहे. यानंतर हे प्रकरण भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेच्या आचारसंहिता समितीपर्यंत तक्रारीद्वारे पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार महुआ मोईत्रा यांनी आरोपाला उत्तर देत जबरी पलटवार केला आहे.… Continue reading पैसे घेतल्याच्या आरोपावर खासदार मोईत्रांचा जबरी पलटवार; मी कधीही, कुठेही***

शुभमन गिलने चौकार मारला अन् ‘सारा’ आनंदाने उड्या मारु लागली

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज शुभमन गिल डेंग्यूवर मात करून मैदानात परतला आहे. गिल 2023 च्या विश्वचषकात भारताचे पहिले दोन सामने खेळू शकला नाही. तो पाकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट खेळात दिसत होता पण लवकर बाद झाला. गिलने बांगलादेशविरुद्ध शानदार फलंदाजी केली. हा सामना पाहण्यासाठी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर पुण्यातील एमसीए… Continue reading शुभमन गिलने चौकार मारला अन् ‘सारा’ आनंदाने उड्या मारु लागली

धक्कादायक…! दिल्लीत चेन स्नॅचिंग प्रशिक्षण शिबिर ! 5 टप्प्यात

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) दिल्लीत गेल्या काही वर्षांत चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. दिल्लीत दररोज अशा 21 घटना उघडकीस येतात, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, चेन स्नॅचिंग शिकवण्यासाठी शाळा चालवल्या जात आहेत. होय, चेन स्नॅचिंग कॅम्प जिथे स्नॅचर्स म्हणजेच दरोडेखोर तयार असतात. मिळालेल्या माहितीनुसार चेन आणि मोबाईल स्नॅचिंगच्या घटनांमुळे दिल्लीतील… Continue reading धक्कादायक…! दिल्लीत चेन स्नॅचिंग प्रशिक्षण शिबिर ! 5 टप्प्यात

मोठी बातमी..! पत्रकार सौम्या विश्वनाथन खून प्रकरणात सर्व आरोपी दोषी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) 2008 मध्ये दिल्ली येथे पत्रकार सौम्या विश्वनाथन यांची पहाटे तीनच्या सुमारास हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना न्यायालयाने दोषी घोषित कले आहे. तसेच चार संशयितांना 302 मकोका अंतर्गत दोषी ठरवले आहे. तर एक आरोपी अजय सेठी याला 311 आणि MCOCA अंतर्गत… Continue reading मोठी बातमी..! पत्रकार सौम्या विश्वनाथन खून प्रकरणात सर्व आरोपी दोषी

इंधनाअभावी पाकिस्तानमध्ये हाहाकार; 48 उड्डाणे करावी लागली रद्द

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) वाढती बेकारी, महागाई, आणि कमी होत असलेला इंधनसाठा यामुळे गेल्या काही महिन्यापासून पाकिस्तानची सामान्य जनता हैराण आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हवाई मार्गासाठी वाहतूक करणाऱ्या विमानांच्या इंधनसाठ्या अभावी पुन्हा एकदा पाकीस्तान सरकार हैरान असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील पेट्रोल आणि डिझेल दर देशातील जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.… Continue reading इंधनाअभावी पाकिस्तानमध्ये हाहाकार; 48 उड्डाणे करावी लागली रद्द

32 हजार कोटींची चोरी: राहुल गांधींचा अदानींवर नवा आरोप

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. तसेच एका परदेशी वृत्तपत्राच्या वृत्ताचा हवाला देत त्यांनी व्यापारी समूहाच्या प्रमुखावर 32 हजार कोटी रुपयांच्या चोरीचा आरोप केला आहे. नेमका काय आहे आरोप… Continue reading 32 हजार कोटींची चोरी: राहुल गांधींचा अदानींवर नवा आरोप

पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा इस्रायल युद्धात रस; राहुल गांधींचा बोचरा वार

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी इस्रायल-हमास युद्धाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. राहुल गांधी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त मिझोरम दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी निशाणा साधला आहे. पुढे बोलताना गांधी म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांना मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारापेक्षा इस्रायल-हमास युद्धात जास्त रस आहे. मात्र ‘माझ्यासाठी ही बाब आश्चर्यकारक आहे… Continue reading पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा इस्रायल युद्धात रस; राहुल गांधींचा बोचरा वार

धक्कादायक..! ‘हमास’ गाझा पट्टीत मुलांना देतय दहशतवादासाठी प्रशिक्षण..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) हमासच्या सैनिकांनी मारलेल्या काही दहशतवाद्यांच्या हेडकॅम आणि कॅमेरा रेकॉर्डरमध्ये हमासच्या विरोधात भितीदायक पुरावे सापडले आहेत. काय पुरावा आहे… हमास दहशतवादी गाझा पट्टीतील मुलांना शस्त्रे वापरण्यासाठी आणि गनिमी युद्ध चालवण्यासाठी लष्करी शैलीचे प्रशिक्षण देत आहेत. त्यासाठी औपचारिकपणे प्रशिक्षण शाळा उघडण्यात आली. यातील अनेक मुले 14 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. दहशतवाद्यांचा खात्मा… Continue reading धक्कादायक..! ‘हमास’ गाझा पट्टीत मुलांना देतय दहशतवादासाठी प्रशिक्षण..!

दिल्ली हादरली; नोएडा गाझियाबादला ही बसले भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) एनसीआरमध्ये रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दिल्लीसह नोएडा आणि गाझियाबादमध्ये रविवारी पृथ्वी हादरली. दुसरीकडे हरियाणाच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के बसले आहेत. यापूर्वी 3 ऑक्टोबर रोजी राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. भूकंपाची तीव्रता इतकी होती की लोक घराबाहेर पडले आणि रस्त्यावर आले. मात्र, या भूकंपात कोणतीही हानी झाल्याचे… Continue reading दिल्ली हादरली; नोएडा गाझियाबादला ही बसले भूकंपाचे धक्के

error: Content is protected !!