नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले असल्याचा गंभीर आरोप उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी केला आहे. यानंतर हे प्रकरण भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेच्या आचारसंहिता समितीपर्यंत तक्रारीद्वारे पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार महुआ मोईत्रा यांनी आरोपाला उत्तर देत जबरी पलटवार केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणावर भाष्य करताना मोईत्रा यांनी म्हटले आहे की, आपण सदर प्रकरणी सीबीआय असो अथवा आचारसंहिता समिती असो कोणासमोरही कधीही चौकशीसाठी हजर व्हायला तयार आहे. मोईत्रा यांनी यावरुन X वर एक संदेश लिहिला असून यात त्यांनी म्हटले..

“मी सीबीआय किंवा आचारसंहिता समिती( ज्यात भाजप सदस्यांचे बहुमत आहे ) यांच्यापुढे जेव्हा कधी बोलावले जाईल तेव्हा चौकशीसाठी हजर होण्यासाठी तयार आहे. मला अदानी निर्देशित मीडिया ट्रायलकडे आणि भाजपच्या ट्रोलकडे लक्ष देण्याचा वेळही नाहीये आणि इच्छाही नाही. “ या प्रतिक्रीयेने भाजपच्या वर्मी घाव बसल्याचं ही स्पष्ट आहे.