नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) वाढती बेकारी, महागाई, आणि कमी होत असलेला इंधनसाठा यामुळे गेल्या काही महिन्यापासून पाकिस्तानची सामान्य जनता हैराण आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हवाई मार्गासाठी वाहतूक करणाऱ्या विमानांच्या इंधनसाठ्या अभावी पुन्हा एकदा पाकीस्तान सरकार हैरान असल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील पेट्रोल आणि डिझेल दर देशातील जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. यातच आता इंधनाच्या तुटवड्याचा परिणाम पाकिस्तानच्या विमान वाहतूक क्षेत्रावर दिसून येत असून PIA ला आपली उड्डाणे रद्द करावी लागत आहेत. यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचा समावेश असल्याचं ही स्पष्ट झालं आहे.


…म्हणून उड्डाणे करावी लागली रद्द ?

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने (पीआयए) इंधनाच्या कमतरतेमुळे 48 उड्डाणे रद्द केली आहेत. थकबाकी न भरल्यामुळे इंधन पुरवठ्यावरील निर्बंध तसेच काही ऑपरेशनल समस्यांमुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या फ्लाइट ऑपरेशनवर परिणाम होत आहे.

काल रद्द झालेल्या 24 उड्डाणेंमध्ये 11 आंतरराष्ट्रीय आणि 13 देशांतर्गत उड्डाणांचा समावेश आहे. त्यामुळे PIA ने बुधवारची 24 उड्डाणेही रद्द केली आहेत. यामध्ये 16 आंतरराष्ट्रीय आणि 8 देशांतर्गत उड्डाणांचा समावेश आहे. याशिवाय अनेक उड्डाणांना उशीर होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.