चंदगड ( प्रतिनिधी ) बेळगाव- वेंगुर्ला मार्गावर कोनेवाडी फाट्या नजीक सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला असून, या अपघात भरधाव कार व दुचाकी यांच्यात जोराची धडक झाली असून, यात चंदगड येथील रवळनाथ ज्युनिअर कॉलेजमध्ये शिंदे प्राध्यापक म्हणून नोकरीला असलेले प्रा. सतीश सीताराम शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.


मिळालेल्या माहितीनुसार पर्यटनासाठी जाणाऱ्या भरधाव कार बेळगाव- वेंगुर्ला मार्गावर कोनेवाडी फाट्या नजीक आली असता भरधाव कारची धडक रस्त्यावरुन जाणाऱ्या दुचाकीला बसली. यात जाणाऱ्या प्रा. सतीश सीताराम शिंदे ( सद्या रा. यशवंतनगर मूळ गाव कोनेवाडी ता. चंदगड ) जागीच ठार झाले तर अन्य एका दुचाकीवरील दोघे जखमी झाले आहेत.

चंदगड पोलिसात दाखलेल्या तक्रारीनुसार मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवत होता. य़ा प्रकरणी कार चालक स्वप्नील सुनिल चांदन ( वय 23 रा. संत ज्ञानेश्वर नगर थेरगाव जि पूणे ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.