कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) दत्तवाड तालुका शिरोळ येथे रस्त्यावरून घरी चालत जाणाऱ्या ऊसतोड मजुरांना स्कार्पिओ वाहनाची जोराची धडक बसल्याने अपघात झाला असून. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी सुमारे 7.30 वाचण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. दरम्यान अपघातानंतर स्कार्पिओ चालकाने पळ काढला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, मलिकवाड मार्गावरून दत्तवाडच्या दिशेने ऊसतोड मजुरी आपल्या खोपट्याकडे चालत जात असताना समोरून येणाऱ्या स्कार्पिओ चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या धडकेत तीन ऊसतोड मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

तर स्कार्पिओ लगत असलेल्या चरित कोसळल्यामुळे स्कार्पिओ मधील एक जण जखमी झाल्याचे घटनास्थळावरून समजते. दरम्यान ही स्कार्पिओ ऊसतोड मजुरांच्या टोळीतीलच असल्याची माहिती मिळाली असून या अपघातातील जखमींना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.