कळे ( प्रातिनिधी ) बाजारभोगाव ते कळे या मुख्य रस्त्यावरील साळवाडी गावानजीक दुचाकी व एस.टी. यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात  किसरूळ (ता. पन्हाळा) येथील घोंगडी व्यावसायिक सुभाष बापू सनगर (वय 58) हे दुचाकीस्वार ठार झालेत. ही घटना सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. 


याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी. रंकाळा बस स्थानकातून एस.टी. क्रमांक (एम. एच  7 सी  7564) ही  मरळे (ता शाहूवाडी) निघाली होती. तर बजाज एमएटी दुचाकी ( एम. एच 09 जी 5606 ) वरून सुभाष सनगर कळे ला घोंगडी विकण्यासाठी जात होते. आज सकाळी दहाच्या सुमारास साळवाडी गावानजीक चाळखोबा पान शाॕप दुकानाजवळ  एसटी व दुचाकी ची समोरासमोर धडक झाली

. त्यामुळे सनगर हे दुचाकीसह एस.टी.खाली गेले. यात सुभाष सनगर गंभीर जखमी झालेत. त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले होते. जखमी अवस्थेतेत त्यांना कोल्हापूरातील सीपीआर मध्ये दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू  झाला. या अपघात नोंद कळे पोलिसात झाली असून अधिक तपास सपोनि. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉ.एम.डी.माळवदे करत आहेत. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा व एक विवाहित मुली असा परिवार आहे.