सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी ) गेले आठ दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या सुकळवाड बाजारपेठ येथील निरज नितीन गावडे वय 20 यांची प्राणज्योत मालवली. मालवण कसाल रस्त्यावर मोटरसायकल अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. गोव्यातील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. कोमात असतानाही झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्याने प्रतिसाद दिला होता. मात्र काळाने त्याच्यावर घाला घातला आहे. त्यामुळे त्याच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे.

सुकळवाड मधील प्रतीत यश हॉटेल व्यवसायिक नितीन गावडे यांचा नीरज एकुलता एक मुलगा होता.स्वभावाने मनमिळावू सर्वांना हवाहवासा वाटणारा सुकाळवाड बाजारपेठेतील हा उमदा तरुण लहान वयातही समाजकार्यातही नेहमी पुढे असायचा. गेल्या आठ दिवसांपूर्वी निरजचा कसाल मालवण रस्त्यावर सुकळवाड येथे मोटरसायकल अपघात झाला होता. त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे नेण्यात आले होते.

उपचारा नाही त्याने चांगला प्रतिसाद दिला होता. त्याचे प्राण वाचू शकतील असे वाटत होते. अपघाताची तिव्रता मोठी होती. मोटर सायकल वरून रस्त्यावर फेकला गेल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दुपारी दोनच्या दरम्यान त्याची प्राण ज्योत मालवली त्याच्या निधनाचे वृत समजताच सर्वानाच धक्का बसला , त्याचे या वयात जाणे सर्वांनाच चटका देऊन जाणारी घटना होती. मनमिळवू स्वभावाचा सर्वांना हवा हवासा वाटणारा एकूलता एक निरजने सर्वांच्याच मनात दुखाचा डोगर करून गेला.

दुर्दैवी निरजचे बारावीपर्यंतचे शिक्षण सिंधू नगरी येथील डॉन बॉस्को शाळेत झाले होते व महाविद्यालयीन शिक्षण सावंतवाडी येथे तो घेत होता. त्याच्या पश्चात आई ,वडील , आजी , बहीण असा परिवार आहे त्याच्या दुखद निधनाने सुकळवाड पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे आज त्याच्यावर सुकळवाड स्मशानभूमीत त्याचेवर शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले. डॉन बॉस्को चे प्राचार्य, शिक्षक व्यवस्थापक व विद्यार्थ्यांनी या दुःखद घटनेबद्दल शोक व्यक्त केला.