कोल्हापूर ( प्रतिनिधी ) जुबेर काझी, अफरीन बुखारी, फरजाना काझी हे कात्यायनी, ता. करवीर येथील रहिवाशी आहेत. यापैकी अफरीन बुखारीचे काही महिन्यांपुर्वी लग्न झाले असून, गेल्या काही दिवसांपासून तीला संधिवाताचा त्रास आहे. तिच्या उपचारासाठी हे कुटुंबिय सायंकाळी कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेलं होतं. दरम्यान 18 मार्च रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास यांच्या दुचाकीला शेतातील जनावराने जोराची धडक दिली. यात अफरीन बुखारी ही ठार झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री शेतातील जनावराने अचानक दिलेल्या धडकेत दुचाकीवरील जुबेर काझी, अफरीन बुखारी, फरजाना काझी हे रस्त्यावर आपटल्यानं गंभीर जखमी झाले. त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी अफरीन बुखारी हिचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला.

अफरीन बुखारी, फरजाना काझी यांना रिक्षातून तर जुबेर काझीला रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान गंभीर जखमी असलेल्या तिघांपैकी अफरीन बुखारीचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. तर आई फरजाना काझी आणि भाऊ जुबेर काझी यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर दुधाळी परिसरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.