एकरकमी 3500 दिल्याशिवाय कोयता लावू देणार नाही; ‘स्वाभिमानी’चा एल्गार

कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) गेल्या हंगामात तुटलेल्या ऊसाला एफआरपी शिवाय टनास 400 रुपये जास्त मिळाल्याशिवाय जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावरून उठणार नाही असा नवा एल्गार माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे झालेल्या 22 व्या विराट ऊस परिषदेत केला. चालू हंगामातील ऊसाला एकरकमी 3500 उचल मिळाल्याशिवाय ऊसाला कोयता लावू देणार नाही असेही त्यांनी जाहीर केले. या परिषदेला… Continue reading एकरकमी 3500 दिल्याशिवाय कोयता लावू देणार नाही; ‘स्वाभिमानी’चा एल्गार

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका…

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. तर खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना तातडीने एअर अँम्ब्युलन्सने मुंबईत हलवण्यात येणार आहे. तशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत. खडसे यांच्यावर मुंबईत पुढील उपचार केले जाणार आहेत.

धक्कादायक..! आत्महत्या केलेल्या मराठा तरुणांच्या कुटुंबाला दिलेला चेक बाऊन्स

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण तापले होते. याला मनोज जरांगे यांनी पुर्णविराम दिला. यानंतर आता राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांचा मदतीचा दिलेला चेक बाऊन्स झाला असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथील गणेश काकासाहेब कुबेर (28) या… Continue reading धक्कादायक..! आत्महत्या केलेल्या मराठा तरुणांच्या कुटुंबाला दिलेला चेक बाऊन्स

पुढील 5 वर्षे मी कर्नाटकचा मुख्यमंत्री; सिद्धरामय्यांच्या विधानाने चर्चेला उधान

बेंगलोर ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या बातम्या सुरु आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात बिनसल्याची चर्चा ही आहे. या चर्चेला गुरुवारी आणखी बळ मिळाले. कारण कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपण पूर्ण पाच वर्षे कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर राहणार असल्याचे म्हटले आहे. या सरकारचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर सत्ताधारी काँग्रेसमधील एका… Continue reading पुढील 5 वर्षे मी कर्नाटकचा मुख्यमंत्री; सिद्धरामय्यांच्या विधानाने चर्चेला उधान

पंतप्रधानांना जगभरात फिरायला वेळ आहे पण जरांगे ना एक फोन करण्यासाठी वेळ नाही- संजय राऊत

मुंबई ( प्रतिनिधी ) मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेले अनेक दिवस आदोंलन सुरू आहे. या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले असून त्यांना अनेक जिल्ह्यातून विविध प्रकारे पाठींबा मिळत आहे. यातच आमदार खासदारांचे राजीनामा नाट्य ही सुरु आहे. मात्र प्रचारात व्यस्त असल्याने संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जरांगे पाटील यांचे प्राण पणाला… Continue reading पंतप्रधानांना जगभरात फिरायला वेळ आहे पण जरांगे ना एक फोन करण्यासाठी वेळ नाही- संजय राऊत

मोठी बातमी..! ‘बिद्री’चे लेखपरिक्षण होणार- प्रकाश आबिटकर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूरसह भुदरगड पंचक्रोशीत सध्या दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीवरुन वातावरण चांगलचं तापले आहे. त्यामुळे बिद्री लढवण्यासाठी सत्ताधारी गट तसेच विरोधकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या लेखापरीक्षणाचे आदेश प्रादेशिक सहसंचालक साखर आयुक्तांनी दिलेले आहेत. मिळालेल्या आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार प्रादेशिक सहसंचालक… Continue reading मोठी बातमी..! ‘बिद्री’चे लेखपरिक्षण होणार- प्रकाश आबिटकर

केवळ बैठकांचा खेळ करु नका; संभाजी राजे छत्रपती संतापले

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेले आठ दिवस मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांची प्रकृती आता खालावत चालली आहे. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाज संतापला असून आता माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी ही याबाबत आपली भुमिका व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर पोस्ट करत संभाजी राजे छत्रपती… Continue reading केवळ बैठकांचा खेळ करु नका; संभाजी राजे छत्रपती संतापले

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठक संपन्न; मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आज सह्याद्री अतिथीगृह येथे उपस्थित राहिले. आजच्या या बैठकीत मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय ठराव संमत करण्यात आला. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे… Continue reading मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठक संपन्न; मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत

महाराष्ट्रात ‘एक फुल दोन हाफ’ हेच काडीखोर- संजय राऊत

मुंबई ( प्रतिनिधी ) गेले काही दिवस आरक्षणावरुन राज्यात सकल मराठा समाजात संतापाची लाट आहे. राज्यात अनेक ठिकाणी साखळी उपोषणे सुरु आहेत. तर अनेक जिल्ह्यात सकल मराठा समाजाने खासदार आमदारांना घेराव घालत जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे. शिवसेना उद्धव… Continue reading महाराष्ट्रात ‘एक फुल दोन हाफ’ हेच काडीखोर- संजय राऊत

कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु – चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) आज मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली यामध्ये मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली. या बैठकीतील माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी म्हटले कि, न्यायमूर्ती  संदिप शिंदे यांची जी समिती गठीत केली होती त्या समितिने गेल्या 40 -45 दिवसांमध्ये अथक मेहनत घेऊन एक कोटी… Continue reading कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु – चंद्रकांत पाटील

error: Content is protected !!