पन्हाळा तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज…

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यात ५० ग्रामपंचयतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी १० ग्राम पंचायती बिनविरोध झाल्यामुळे आता उद्या (रविवार) ४० ग्रामपंचयतीसाठी मतदान होणार आहे. यासाठी  प्रशासनाने मतदान यंत्रणा सज्ज ठेवली असून आज (शनिवार) कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत. पन्हाळा तालुक्यातील १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ४० ग्रामपंचायतीच्या २९६ सदस्यपदासाठी ६६१ उमेदवार रिंगणात आहेत. तर ११… Continue reading पन्हाळा तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज…

राज्यात भाजपचे बिलावल भुट्टोविरोधात आंदोलन

मुंबई (प्रतिनिधी) : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षाने आज (रविवारी) आंदोलन केले. बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्याविरोधात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपने आंदोलन केले आहे. भुट्टो यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे पुतळेही जाळले आहेत.  बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या अवमानजनक वक्तव्याच्या… Continue reading राज्यात भाजपचे बिलावल भुट्टोविरोधात आंदोलन

महाविकास आघाडीचा मोर्चा असफल : फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीचा आजचा मोर्चा असफल झाला आहे. तीन पक्ष एकत्र येऊनदेखील आजची संख्या पाहता हा मोर्चा ड्रोनश़ॉट लायकदेखील नव्हता, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाविकास आघाडीच्या मोर्चानंतर फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना मोर्चावर जोरदार टीका केली. फडणवीस म्हणाले की, आजचा महाविकास आघाडीचा मोर्चा हा असफल मोर्चा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी… Continue reading महाविकास आघाडीचा मोर्चा असफल : फडणवीस

महामोर्चा शिवसेनेचा; नावाला फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीचा सहभाग : आंबेडकर

नाशिक (प्रतिनिधी) : शनिवारी काढलेला महामोर्चा हा महाविकास आघाडीचा होता; मात्र महाविकास आघाडीमध्ये आम्हाला घ्यायला मतभेद आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आम्हाला महाविकास आघाडीत घेण्यास विरोध आहे, असे वक्तव्य करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ‘मविआ’च्या महामोर्चात सामील न होण्याचे कारण सांगितले. ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गरिबाला सत्तेत येऊच द्यायचे नाही. हा मोर्चा शिवसेनेचा आहे,… Continue reading महामोर्चा शिवसेनेचा; नावाला फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीचा सहभाग : आंबेडकर

राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करा : शरद पवार

मुंबई (प्रतिनिधी) : ज्यांच्या हातात सत्तेची चावी आहे, ते महाराष्ट्राचा महापुरुषांबाबत चुकीची भाषा वापरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. मोर्चाच्या रुपाने ही जनशक्ती महाराष्ट्राच्या सन्मानासाठी एकवटली आहे. सध्या महाराष्ट्राच्या सन्मानावर हल्ले होत आहेत. या सरकामध्ये सध्या महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धा सुरू आहे, असा आरोप करून महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल भगतसिंह… Continue reading राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करा : शरद पवार

‘ध’ चा ‘मा’ करु नका; चंद्रकांत पाटील यांचा उपरोधिक सल्ला

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वाचताना नीट वाचा. ‘ध’ चा ‘मा’ करु नका असा उपरोधिक सल्ला वाचकांना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (शुक्रवारी) कोल्हापुरात दिला. दरम्यान, ‘मी सांगतोय ना’ असे म्हणत चंद्रकांत पाटील कार्यकर्त्यांवर भडकले. त्याचे असे झाले की, आज कोल्हापुरात पुण्याच्या धर्तीवर फिरत्या वाचनालयाच्या गाडीचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.… Continue reading ‘ध’ चा ‘मा’ करु नका; चंद्रकांत पाटील यांचा उपरोधिक सल्ला

दसरा मेळाव्यासाठी एसटी बुक प्रकरणी शिंदे सरकारला धक्का

मुंबई (प्रतिनिधी) :  बाळासाहेबांची शिवसेनेने मुंबईतील बीकेसी मैदानावर भव्य असा दसरा मेळावा आयोजित केला होता, पण या मेळाव्याला गर्दी जमवणे आणि खर्चावरून हायकोर्टाने शिंदे सरकारला धक्का दिला आहे. १० कोटी खर्चाच्या चौकशी प्रकरणाच्या याचिकेचे आता जनहित याचिकेत रूपांतर करून दुसऱ्या खंडपीठासमोर पाठवण्याचे निर्देश दिले आहे. शिवसेना आणि शिंदे गटामध्ये गर्दी जमवण्यासाठी चांगलीच शर्यत रंगली होती.… Continue reading दसरा मेळाव्यासाठी एसटी बुक प्रकरणी शिंदे सरकारला धक्का

नाशिकमध्ये ठाकरे गटाला खिंडार, शिंदे गटात प्रवेश

मुंबई (प्रतिनिधी) : नाशिकमधील ठाकरे गटाचे ११ माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आणि मनसेच्या एका शहर पदाधिकाऱ्याने शिंदे गटात प्रवेश केला. शुक्रवारी सकाळी ८ वाजता या सर्वांचा प्रवेश सोहळा वर्षा निवासस्थानी पार पडला. शिंदे गटासह भाजपवर हल्लाबोल करत संजय राऊत मुंबईत परतले. नाशिककडे पाठ करुन मुंबईच्या दिशेने जात असताना आणि नाशिकची हद्दही सोडलेली नसताना ठाकरे गटाच्या माजी… Continue reading नाशिकमध्ये ठाकरे गटाला खिंडार, शिंदे गटात प्रवेश

सीमावादाच्या आंदोलनामागचा मास्टरमाईंड शोधा : अजित पवार

मुंबई (प्रतिनिधी) : सीमाभागामध्ये शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी दोन्ही राज्यांनी दिल्लीत ठरवल्याप्रमाणे वागले पाहिजे. सीमावादाच्या आंदोलनामागचा मास्टरमाईंड शोधावा, अशी मागणी गुरुवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. ते मुंबईत बोलत होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी वारंवार वक्तव्ये करून महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम केल्याचा घणाघात करून अजित पवार म्हणाले, सीमावाद पेटवणारा सूत्रधार कोण आहे, हे का… Continue reading सीमावादाच्या आंदोलनामागचा मास्टरमाईंड शोधा : अजित पवार

ठाकरेंच्या आणखी एका आमदाराची एसीबीकडून चौकशी

मुंबई (प्रतिनिधी) उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या आणखी एका आमदाराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण या आमदाराची आज तब्बल साडेचार तास चौकशी करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची अलिबागच्या एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली. राजन साळवी हे आज सकाळी ११.३० वाजता चौकशीसाठी यानंतर दुपारी ४ वाजेपर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली. नगरसेवकपदापासून… Continue reading ठाकरेंच्या आणखी एका आमदाराची एसीबीकडून चौकशी

error: Content is protected !!