मुंबई ( प्रतिनिधी ) मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेले अनेक दिवस आदोंलन सुरू आहे. या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले असून त्यांना अनेक जिल्ह्यातून विविध प्रकारे पाठींबा मिळत आहे. यातच आमदार खासदारांचे राजीनामा नाट्य ही सुरु आहे. मात्र प्रचारात व्यस्त असल्याने संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार जरांगे पाटील यांचे प्राण पणाला लागले आहेत. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हा प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न का करत नाही असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी म्हटले की, “महाराष्ट्र पेटला आहे.

राज्यात या प्रश्नावरून लोकं आत्महत्या करत आहेत. जरांगे पाटील यांचे प्राण पणाला लागले आहेत. त्यांच्या जीवाचे बरे-वाईट झाले तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. त्यांना महाराष्ट्र पेटवायचा आहे का ? हे त्यासाठी सगळं चाललं आहे का ?

पंतप्रधानांनी दूरध्वनीवरून त्यांच्याशी बोलले पाहिजे, का त्यासाठीही वेळ नाही ? एक एक तास मन की बात करता, जगभरात फिरता, जगभरच्या नेत्यांना मिठ्या मारता,मात्र आपला प्राण पणाला लावलेल्या महाराष्ट्रातील एक सुपुत्राशी बोलायला तुम्हाला वेळ नाही ? मुख्यमंत्र्यांना दिल्लीचा आशिर्वाद आहे ना ? वाचवा प्राण जरांगे पाटील यांचे असे ही त्यांनी म्हटले आहे.