सुप्रिया मोहिते यांना राज्यस्तरीय “व्यसनमुक्ती – मधुमेहमुक्ती ” पुरस्कार प्रदान

कळे (प्रतिनिधी) : समर्थ सोशल फौंडेशन कोल्हापूर या संस्थेकडून दरवर्षी राज्यभरात सामाजिक कार्य करून लाखो लोकांना व्यसनमुक्त – मधुमेहमुक्त करण्यासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा “राज्यस्तरीय व्यसनमुक्ती – मधुमेहमुक्ती दूत” हा पुरस्कार या वर्षी कोल्हापूर येथील सुप्रिया दिलीपराव मोहिते यांना लाभला आहे. कोल्हापुरातील सयाजी हॉटेल येथे समर्थ सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख, संचालक… Continue reading सुप्रिया मोहिते यांना राज्यस्तरीय “व्यसनमुक्ती – मधुमेहमुक्ती ” पुरस्कार प्रदान

मोरेवाडीतील तरूणाचा प्रामाणिकपणा, सापडलेले पाकीट केले परत…

कळे (प्रतिनिधी) : महत्वाची कागदपत्रे असलेले पाकीट प्रामाणिकपणे परत करून समाजात अजूनही प्रामाणिकपणा टिकून असल्याचे उदाहरण मोरेवाडी ( ता.पन्हाळा ) येथे पाहावयास मिळाले. मोरेवाडी ( ता.पन्हाळा ) येथील सुभाष गणपती पाटील हे सावर्डे येथे कामानिमित्त येत असताना त्यांना मल्हारपेठ – सांगरूळ मार्गावरती मोरेवाडीजवळ रस्त्यावरती हरवलेले पाकीट सापडले. पाटील यांनी पाकीट पाहीले असता काही महत्वाची कागदपत्रे… Continue reading मोरेवाडीतील तरूणाचा प्रामाणिकपणा, सापडलेले पाकीट केले परत…

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्री 120 वी जयंती साजरी

कोल्हापूर(प्रतिनिधी): भाजपा तर्फे कोल्हापूरातील शास्रीनगर येथील माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्री यांची 120 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाजपा अनुजाती मोर्चा कोल्हापूर,महानगर जिल्हा अध्यक्ष अनिल कामत यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी मोर्चाचे शासकीय योजना समन्वयक रणजीत औंधकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.जयंतीचे संयोजक भाजपा अनु जाती मोर्चा कोल्हापूर महानगर उपाध्यक्ष प्रशांत अवघडे,मोर्चाचे… Continue reading माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्री 120 वी जयंती साजरी

‘सहकार से समृद्ध’ हे ब्रिद घेऊन भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था कार्यरत : अरुंधती महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महिला सक्षमीकरणासाठी गेल्या पंधरा वर्षापासून आपण प्रयत्नशील आहोत. तसेच भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून कष्टकरी वर्गाचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी येत्या वर्षभरात विविध योजना राबवल्या जाणार आहेत. सहकार से समृद्ध हे ब्रिद घेऊन ही संस्था कार्यरत असल्याचे अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी सांगितले. त्या पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत कोल्हापूरात बोलत होत्या. अरुधंती महाडिक म्हणाल्या की, या… Continue reading ‘सहकार से समृद्ध’ हे ब्रिद घेऊन भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था कार्यरत : अरुंधती महाडिक

पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेला ‘1.50’ कोटींचे बक्षीस…

पन्हाळा (प्रतिनिधी) : आमदार डॉ. विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेले सलग सहा वर्षे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देश पातळीवर पन्हाळ नगरपरिषद चांगली कामगिरी करीत आहे. राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये उत्तुंग कामगिरी करत या नगरपरिषदेने तृतिय क्रमांक पटकावला आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या माझी वसुंधरा अभियाना ४.० अंतर्गत मध्ये १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या… Continue reading पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेला ‘1.50’ कोटींचे बक्षीस…

महिलांचे कायदेविषयक हक्क – अधिकार जनजागृती सत्र संपन्न

कुरूंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्विनी अभियानांतर्गत सर्व वयोगटातील महिलांसाठीचे महिलांचे कायदे विषयक हक्क आणि अधिकार जनजागृती सत्र मजरेवाडी रोड कुरुंदवाड येथे संपन्न झाले. यशस्विनी अभियानांतर्गत अॅड. आसावरी कुलकर्णी, अॅड.किशोरी भोसले, पल्लवी वाघ, विदुला पंडितराव, वर्षा भोसले यांनी महिलांना कायदेविषयक हक्क आणि अधिकार… Continue reading महिलांचे कायदेविषयक हक्क – अधिकार जनजागृती सत्र संपन्न

ही खऱ्या अर्थाने आरोग्यक्रांती : आ. प्रकाश आबिटकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या आरोग्याच्या प्रश्न आता मिटला आहे. ‘4 कोटी 80 लाख निधीतून’ प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली असून जनतेचे आरोग्यहित या माध्यमातून साधले जाणार आहे. ‘म्हासुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण’ आज आ. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. आ. प्रकाश आबिटकर काय म्हणाले..? आ. प्रकाश आबिटकर म्हणाले, ज्याप्रमाणे अन्न… Continue reading ही खऱ्या अर्थाने आरोग्यक्रांती : आ. प्रकाश आबिटकर

बँकांनी दैनंदिन सेवा लोकांना चांगल्या द्याव्यात : जिल्हाधिाकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्व बँकांनी आपल्याकडील दैनंदिन सेवा देताना सकारात्मक दृष्टिकोण ठेवून चांगल्या सेवा लोकांना द्याव्यात. अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. ते जिल्हा सल्लागार समिती आणि जिल्हास्तरीय आढावा समितीची बैठकीत आज (गुरुवार) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलत होते. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालू खरीप हंगाम पीक कर्ज वाटपामध्ये सर्व बँकांनी मिळून 102% उद्देश पूर्तता केल्याबद्दल… Continue reading बँकांनी दैनंदिन सेवा लोकांना चांगल्या द्याव्यात : जिल्हाधिाकारी

कोल्हापूरात महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्य कार्यकारणी बैठक ’28 सप्टेंबर’ला होणार

कोल्हापूर – संपूर्ण महाराष्ट्रातील नाभिक समाजामध्ये अतिशय ध्येय आणि धोरणे घेऊन काम करणारी संघटना म्हणून महाराष्ट्र नाभिक महामंडळ या संघटनेकडे पाहिले जाते. या संघटनेच्या वतीने आज पर्यंत अनेक मोठमोठी आंदोलने संपूर्ण महाराष्ट्रात पार पडलेली आहेत. विद्यमान शासनाने “श्री संत सेना महाराज केश शिल्पी महामंडळाची” स्थापना केलेली आहे. त्याचे संपूर्ण यश हे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे आहे.… Continue reading कोल्हापूरात महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्य कार्यकारणी बैठक ’28 सप्टेंबर’ला होणार

एनसीसी विद्यार्थ्यांच्या वतीने जागतिक नदी दिन साजरा

कोल्हापूर : 56 महाराष्ट्र बटालियन एनसीसी विद्यार्थ्यांच्यावतीने आज जागतिक नदी दिन स्वच्छता करुन साजरा करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी पंचगंगा नदी घाट परिसरात आज स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी 2 टन कचरा उठाव करण्यात आला. यानंतर नदी संवर्धनाबाबत पंचगंगा घाटावर पदनाट्य, पोस्टर प्रेझेंटेशन असे विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच नागरिकांनी नदी स्वच्छ ठेवण्याबाबत प्रभात फेरी काढून… Continue reading एनसीसी विद्यार्थ्यांच्या वतीने जागतिक नदी दिन साजरा

error: Content is protected !!