भोगावती साखर कारखान्याची मार्चमधील ऊसबिले बँक खात्यावर जमा..!

अध्यक्ष शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांची माहिती भोगावती ( प्रतिनिधी ) – शाहूनगर परिते ता . करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील दिनांक १ ते २६ मार्च अखेरच्या ऊसाचे बिल प्रतिटन ३२०० रुपयांप्रमाणे २६ कोटी १५ लाख रुपये बिल ऊसउत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केली असून आतापर्यंत संपूर्ण हंगामाचे १६३ कोटी४२… Continue reading भोगावती साखर कारखान्याची मार्चमधील ऊसबिले बँक खात्यावर जमा..!

धक्कादायक..! कोथळीत 22 वर्षीय युवतीची आत्महत्या

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) प्रेमप्रकरणातून कोथळी ता. करवीर जिल्हा कोल्हापूर येथील महाविद्यालयीन युवतीने आज सकाळी घरच्या स्वयंपाक घरात दोरीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत युवतीचे वय 22 वर्षे होते, काही दिवसांपूर्वी याबाबत बाचाबाची झाली होती मात्र तीने आज अचानक घेतलेल्या या निर्णयाने कोथळी परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्या केल्याची माहिती मिळताच… Continue reading धक्कादायक..! कोथळीत 22 वर्षीय युवतीची आत्महत्या

वंदूर येथे पार पडला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

कागल ( प्रतिनिधी ) वंदूर (ता. कागल) येथील न्यू इंग्लिश स्कूल वंदूर या शाळेतील सन 2006-07 या शैक्षणिक वर्षांमधील माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून वनभोजन कार्यक्रम अंगण फार्म हाऊस वंदूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री धो.जा.पाटील, श्री एस एस कांबळे, श्री विजय रा. हाबळे, श्री ए एन चौगुले, श्री पी बी पोवार, श्री अपुगडे… Continue reading वंदूर येथे पार पडला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात देशाचा नावलौकिक वाढवला :युवराज पाटील

कागल ( प्रतिनिधी ) – पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जगभरात देशाचा नावलौकिक वाढवला आहे. काँग्रेस आघाडी अंतर्गत कलहाने ग्रासली असून एकमेकांना पाडण्याचे काम ती करत आहे. त्यामुळे देशाला भक्कम नेतृत्व द्यायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात भक्कम करण्यासाठी संजय मंडलिक यांना मतदान करा. असे आवाहन यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील बापू… Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात देशाचा नावलौकिक वाढवला :युवराज पाटील

प्रभू श्री रामचंद्राच्या धनुष्यबाणाला मताधिक्य द्या ; धैर्यशील माने यांचं आवाहन

इस्लामपुर ( प्रतिनिधी ) – राज्यातील व केंद्रातील महायुतीच्या सरकारने ईश्वरपूर शहरासाठी ३३८ कोटीचा विकास निधी दिला आहे. यापुर्वीच्या कोणत्याही खासदारांने शहराला इतका निधी दिला नसुन भविष्यकाळात ईश्वरपुरचा कायापालट करण्यासाठी पुन्हा प्रभू श्री रामचंद्राच्या धनुष्यबाणाला मताधिक्य द्या असे आवाहन खास. धैर्यशील माने यांनी ईश्वरपुर येथील संवाद बैठकीत बोलताना केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले, ईश्वरपुर येथे… Continue reading प्रभू श्री रामचंद्राच्या धनुष्यबाणाला मताधिक्य द्या ; धैर्यशील माने यांचं आवाहन

महाविकास आघाडीचे युवा नेते आज ‘कोल्हापुरात’

कोल्हापूर : कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरमध्ये सभा झाली.यानंतर  आज महाविकास आघाडीच्या युवा नेते कोल्हापुरात येत आहेत. ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित आर पाटील,आमदार रोहित पवार यांच्या आज तोफा धडाडणार आहेत. महाविकास आघाडीच्या या युवा नेत्यांच्या सभा… Continue reading महाविकास आघाडीचे युवा नेते आज ‘कोल्हापुरात’

कागल तालुक्याच्या स्वाभिमानासाठी प्रा.संजय मंडलिक यांना निवडून द्यावे ; विजय काळे यांचे प्रतिपादन

कागल (प्रतिनिधी ) – कागल तालुक्याच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे. जास्तीत जास्त मतांनी आपल्याला संजय मंडलिक यांना निवडून द्यायचे आहे, त्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करावे. कागल तालुक्याच्या स्वाभिमानासाठी प्रा. संजय मंडलिक यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून द्यावे, असे आवाहनही विजय काळे यांनी केले. कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ रणदिवेवाडी, ता.कागल येथे… Continue reading कागल तालुक्याच्या स्वाभिमानासाठी प्रा.संजय मंडलिक यांना निवडून द्यावे ; विजय काळे यांचे प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदींना महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडून संत बाळुमामा यांची प्रतिमा भेट

कोल्हापूर / प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आलेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महायुतीचे उमेदवार खास. धैर्यशील माने यांनी संत बाळुमामा यांची प्रतिमा भेट दिली . महाराष्ट्र, कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. क्षेत्र संत बाळुमामांच्या भूमीत कोल्हापूर जिल्हाच्या डोंगराळ भागात धनगर समाजाच्या अनेक वाड्यावस्त्या वसलेल्या आहेत . त्यांच्यासह देशातील धनगर समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत.… Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदींना महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडून संत बाळुमामा यांची प्रतिमा भेट

ही लोकसभा निवडणूक केवळ एका व्यक्तीसाठी नाही तर देशाच्या प्रगतीची दिशा ठरविणारी आहे – धैर्यशील माने

इचलकरंजी ( प्रतिनिधी ) : गेल्या पाच वर्षात राजकारणापलीकडे जाऊन समाजकारण केले आहे.ही लोकसभा निवडणूक केवळ एका व्यक्तीसाठी नाही तर देशाच्या प्रगतीची दिशा ठरविणारी आहे. जनतेला मोफत धान्य देणारे जगाच्या पाठीवर एकमेव सरकार म्हणजे मोदी सरकार असून सर्व योजना घरा घरापर्यंत पोहोचवल्या आहेत. शिरोळ तालुक्यात ज्या पद्धतीने पुष्पदृष्टी करून स्वागत करण्यात आले.त्याच ताकदीने माझ्यावर मतांचा… Continue reading ही लोकसभा निवडणूक केवळ एका व्यक्तीसाठी नाही तर देशाच्या प्रगतीची दिशा ठरविणारी आहे – धैर्यशील माने

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात आजपर्यंत झाली नाही अशी सभा घेण्याचे नियोजन : मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २९ एप्रिल रोजी होणाऱ्या पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ताधारी आघाडीची शुक्रवारी बैठक घेण्यात आली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार,आमदार राहुल कुल , हर्षवर्धन पाटील , विजय शिवतारे, राजेश पांडे… Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात आजपर्यंत झाली नाही अशी सभा घेण्याचे नियोजन : मंत्री चंद्रकांत पाटील

error: Content is protected !!