कोल्हापूर / प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आलेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महायुतीचे उमेदवार खास. धैर्यशील माने यांनी संत बाळुमामा यांची प्रतिमा भेट दिली .

महाराष्ट्र, कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. क्षेत्र संत बाळुमामांच्या भूमीत कोल्हापूर जिल्हाच्या डोंगराळ भागात धनगर समाजाच्या अनेक वाड्यावस्त्या वसलेल्या आहेत . त्यांच्यासह देशातील धनगर समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. आरक्षणावरून धनगर समाजाने रान उठवले आहे . याबाबत खास . धैर्यशील माने यांनी संसदेत आवाज उठवत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्र मार्गी लावण्याची मागणी लावून धरली आहे . लोकसभा निवडणुक प्रचारार्थ आज पंतप्रधान मोदी कोल्हापुरात आले असता त्यांनी खास . धैर्यशील माने यांच्याकडे याबाबत विचारणा केली . खास . माने यांनी तात्काळ या प्रश्नावर संसदेत आवाज उठविल्याची आठवण करून देत संत बाळु मामांची प्रतिमा भेट दिली .

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले , माजी खास . निवेदिता माने व अन्य मान्यवर उपस्थित होते .