कागल ( प्रतिनिधी ) वंदूर (ता. कागल) येथील न्यू इंग्लिश स्कूल वंदूर या शाळेतील सन 2006-07 या शैक्षणिक वर्षांमधील माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून वनभोजन कार्यक्रम अंगण फार्म हाऊस वंदूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री धो.जा.पाटील, श्री एस एस कांबळे, श्री विजय रा. हाबळे, श्री ए एन चौगुले, श्री पी बी पोवार, श्री अपुगडे सर, दहावी वर्गातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सन्माननीय गुरुवर्य आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा सत्कार व स्वागत सोहळा संपन्न झाला. उपस्थित सर्वच मित्र-मैत्रिणी यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर गुरुजनवर्गांचेही पुन्हा एकदा योग्य मार्गदर्शन उपस्थितांना केले, या कार्यक्रमांमध्ये हायस्कूलचे नवीन इमारत बांधणीसाठी योगदान असणारे माननीय माजी मुख्याध्यापक एस एस कांबळे यांचा सेवानिवृत्त झालेबद्दल सर्व गुरुजन आणि विद्यार्थ्यामार्फत सत्कार करण्यात आला, माजी विद्यार्थ्यांनी.

याप्रसंगी विविध मनोरंजनाचे कलागुण सादर केले. हसत खेळत खेळीमेळीच्या वातावरणात वनभोजन संपन्न झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी केशव कांबळे, केशव एकनाथ कांबळे, प्रास्ताविक रोहिदास अशोक कांबळे, शितल मोहन घुगरे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.