इचलकरंजी ( प्रतिनिधी ) : गेल्या पाच वर्षात राजकारणापलीकडे जाऊन समाजकारण केले आहे.ही लोकसभा निवडणूक केवळ एका व्यक्तीसाठी नाही तर देशाच्या प्रगतीची दिशा ठरविणारी आहे. जनतेला मोफत धान्य देणारे जगाच्या पाठीवर एकमेव सरकार म्हणजे मोदी सरकार असून सर्व योजना घरा घरापर्यंत पोहोचवल्या आहेत. शिरोळ तालुक्यात ज्या पद्धतीने पुष्पदृष्टी करून स्वागत करण्यात आले.त्याच ताकदीने माझ्यावर मतांचा वर्षाव होईल,असा विश्वास हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ धैर्यशील माने यांनी शिरोळ तालुक्याचा दौरा केला. त्यांनतर टाकवडे (ता. शिरोळ) येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. माने यांनी तमदलगे, कोंडीग्रे, यड्राव, जांभळी, धरणगुत्ती आदी गावांत प्रचार करत पदयात्रा काढली. महायुतीतील घटक पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थांनी उस्फुर्तपणे धैर्यशील माने यांचे स्वागत केले. महिलांनी गावच्या वेशीवर औक्षण करून स्वागत केले. काही गावांत जेसीबीतून माने यांच्यावर पुष्पवृष्टी करत विजयाचा निर्धार केला.

दिवसभर शिरोळ तालुक्याचा प्रचार दौरा झाल्यानंतर सायंकाळी टाकवडे येथे प्रचार सभा झाली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना राजवर्धन नाईक निंबाळकर म्हणाले,”येणाऱ्या काळात नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत. मोदींच्या बाजूने हात वर करणारा खासदार म्हणून धैर्यशील दादा असले पाहिजेत. धैर्यशील दादांनी कधीच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले नाहीत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांच्या विचारावर कायम आहेत. या निवडणुकीत धैर्यशील दादांना शिरोळ तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देऊन निवडून देऊया,असे आवाहन केले.

यावेळी शरद साखर कारखान्याचे संचालक प्रकाश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे, चंद्रकांत मोरे , भाजप तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे, मनोहर निर्मळ, उदय झुटाळ, शहाजी भोसले, अबूबगर बारगीर, अविनाश पाटील, पोपट पुजारी,राजू पाटील भोपाल मागलेकर, दाजी मगदूम,तानाजी झुटाळ, रोहित पाटील, सुनील पाटील, अशोक कुंभार, शकुंतला कांबळे, जमाल फकीर, सुनील निर्मळ यांसह कार्यकर्ते,मोठ्या संख्येने उपस्थित होते.