अध्यक्ष शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांची माहिती

भोगावती ( प्रतिनिधी ) – शाहूनगर परिते ता . करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील दिनांक १ ते २६ मार्च अखेरच्या ऊसाचे बिल प्रतिटन ३२०० रुपयांप्रमाणे २६ कोटी १५ लाख रुपये बिल ऊसउत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केली असून आतापर्यंत संपूर्ण हंगामाचे १६३ कोटी४२ लाख रुपये ऊस बिलापोटी वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील देवाळेकर व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली .

कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील ऊसासाठी प्रतिटन ३२०० रुपये ऊसदर जाहीर केला होता. मार्चमध्ये गाळप झालेल्या ८१७१९ मेट्रीक टन २६ कोटी १५ लाख ३७९४ रक्कम संबंधित ऊसउत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे . कारखान्याने आतापर्यंत संपूर्ण हंगामातील ५ लाख १०६८९ टन ऊसाच्या बिलापोटी १६३ कोटी४२ लाख रुपये बिल शेतकऱ्यांना दिलेले आहे असे त्यांनी सांगितले .

कारखान्याने यंदाच्या हंगामात १२२ दिवसात ५१०६८९ टन ऊसाचे गाळप करून ६२९३२० क्विंटल साखर उत्पादित केली . सरासरी साखर उतारा १२.३२टक्के एवढा आहे .कारखान्याच्या संचालक मंडळाने काटकसरीने कारभार करत ऊस उत्पादकांना व कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. आगामी हंगामात सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून ऊस उत्पादकांनी आपला संपुर्ण ऊस कारखान्याकडे नोंद करून सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष पाटील व उपाध्यक्ष कवडे यांनी केले आहे . यावेळी सर्व संचालक मंडळ ,प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील सचिव उदय मोरे उपस्थित होते .