पराभव दिसू लागल्यानेच विकासाचे मुद्दे सोडून विरोधकांकडून खालच्या स्तराचे राजकारण सुरु : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर( प्रतिनिधी ) : मंगळवार पेठ आणि मंगळवार पेठेतील नागरिक हिंदुत्वाला मानणारे आहेत. मंगळवार पेठेने सर्वच निवडणुकांमध्ये आपले बहुमोल मत शिवसेनेच्या पारड्यात टाकले आहे. मंगळवार पेठेचा सर्वांगीण विकास ही शिवसेनेची जबाबदारी असून, येथील मुलभूत सोई सुविधांसह तालीम संस्थांच्या बांधकामाला निधी देवून शिवसेनेने विकास कार्याचे पर्व अखंडीत सुरु ठेवले आहे. सत्ता असो वा नसो समाजकार्याच्या माध्यमातून… Continue reading पराभव दिसू लागल्यानेच विकासाचे मुद्दे सोडून विरोधकांकडून खालच्या स्तराचे राजकारण सुरु : राजेश क्षीरसागर

आदमापूर देवस्थानचा अंतिम निकाल : जूने सर्व विश्वस्थ कायम

कपिलेश्वर (प्रतिनिधी) : आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा देवालय ट्रस्टच्या जुन्या विश्वस्थांना कायम केल्याचा मा. धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांनी निर्णय दिला आहे. देशभरातल्या अखंड सद्गगुरू बाळूमामा भक्तांना मोठा दिलासा दिला असल्याचा़ी प्रतिक्रिया अनेक भक्तांनी दिली. गेले दिड ते दोन वर्ष चाललेल्या या लढ्याला अखेर योग्य तो न्याय मिळाल्याची भावना भक्तांनी व्यक्त केली आहे. सद्गगुरू बाळूमामा… Continue reading आदमापूर देवस्थानचा अंतिम निकाल : जूने सर्व विश्वस्थ कायम

खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी करणसिंह गायकवाड यांचा झंजावाती दौरा..!

शाहूवाडी ( प्रतिनिधी ) – आजवरच्या एकाही खासदाराने शाहूवाडी तालुक्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते मात्र खा. धैर्यशील माने खासदार झाल्यापासून या भागाकडे जातीनिशी लक्ष घालून या भागातील रस्ते ,पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यां बरोबरच औदयोगिक वसाहत उभी करून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचे काम केले आहे . त्यांच्या प्रयत्नांमुळेच दुर्गम भागाच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे… Continue reading खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी करणसिंह गायकवाड यांचा झंजावाती दौरा..!

भाजपाला देशातून तडीपार करा : आदित्य ठाकरे

हातकणंगले (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या स्वाभिमान आणि मराठी अस्मितेवर आक्रमण करून लूट करणाऱ्या मोदी-शहांच्या भाजपाला देशातून तडीपार करून इतिहास घडवा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. ते वडगाव येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले की, माने त्यांची राजकीय कारकीर्द संपली… Continue reading भाजपाला देशातून तडीपार करा : आदित्य ठाकरे

सत्यजित पाटील यांचा निलेवाडी अंबपवाडी पंचक्रोशीत प्रचार दौरा

टोप ( प्रतिनिधी ) देशातील हुकूमशाही मोडीत काढून लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा. असे आव्हान हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी केले. ते कासारवाडी येथील प्रचार दौर्यावेळी बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव ,चावरे, मनपाडळे, पाडळी, अंबपवाडी , कासारवाडी येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा प्रचार दौरा केला. यावेळी माजी… Continue reading सत्यजित पाटील यांचा निलेवाडी अंबपवाडी पंचक्रोशीत प्रचार दौरा

धैर्यशील माने यांच्या विजयासाठी रात्रीचा दिवस करावा : खा. अनिल बोंडे

इचलकरंजी (प्रतिनिधी) : महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी अखेरच्या टप्प्यात सर्वच समर्थक कार्यकर्त्यांनी थेट मतदाराशी संपर्क साधून त्यांना मतदानासाठी आग्रह धरावा. धैर्यशील माने यांच्या विजयांसाठी रात्रीचा दिवस करून मताधिक्य देण्याचे आवाहन खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी धैर्यशील माने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने माजी कृषीमंत्री, राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे, आमदार वसंत खंडेलवाल यांनी… Continue reading धैर्यशील माने यांच्या विजयासाठी रात्रीचा दिवस करावा : खा. अनिल बोंडे

महाराणी ताराराणी, राजर्षी शाहू महाराज यांना राजे राजवर्धन कदमबांडे यांनी केले अभिवादन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाराज यांचे थेट वारसदार आणि पणतू राजे राजवर्धन कदमबांडे मी आज त्यांच्या पूर्वजांच्या पुतळ्यांना अभिवादन करून पुष्पांजली अर्पण केले. युतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी ते कोल्हापूरमध्ये आले होते. राजे कदमबांडे यांनी करवीर संस्थांच्या संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून… Continue reading महाराणी ताराराणी, राजर्षी शाहू महाराज यांना राजे राजवर्धन कदमबांडे यांनी केले अभिवादन…

भोगावती साखर कारखान्याची मार्चमधील ऊसबिले बँक खात्यावर जमा..!

अध्यक्ष शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांची माहिती भोगावती ( प्रतिनिधी ) – शाहूनगर परिते ता . करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील दिनांक १ ते २६ मार्च अखेरच्या ऊसाचे बिल प्रतिटन ३२०० रुपयांप्रमाणे २६ कोटी १५ लाख रुपये बिल ऊसउत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केली असून आतापर्यंत संपूर्ण हंगामाचे १६३ कोटी४२… Continue reading भोगावती साखर कारखान्याची मार्चमधील ऊसबिले बँक खात्यावर जमा..!

धक्कादायक..! कोथळीत 22 वर्षीय युवतीची आत्महत्या

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) प्रेमप्रकरणातून कोथळी ता. करवीर जिल्हा कोल्हापूर येथील महाविद्यालयीन युवतीने आज सकाळी घरच्या स्वयंपाक घरात दोरीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत युवतीचे वय 22 वर्षे होते, काही दिवसांपूर्वी याबाबत बाचाबाची झाली होती मात्र तीने आज अचानक घेतलेल्या या निर्णयाने कोथळी परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्या केल्याची माहिती मिळताच… Continue reading धक्कादायक..! कोथळीत 22 वर्षीय युवतीची आत्महत्या

वंदूर येथे पार पडला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

कागल ( प्रतिनिधी ) वंदूर (ता. कागल) येथील न्यू इंग्लिश स्कूल वंदूर या शाळेतील सन 2006-07 या शैक्षणिक वर्षांमधील माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून वनभोजन कार्यक्रम अंगण फार्म हाऊस वंदूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री धो.जा.पाटील, श्री एस एस कांबळे, श्री विजय रा. हाबळे, श्री ए एन चौगुले, श्री पी बी पोवार, श्री अपुगडे… Continue reading वंदूर येथे पार पडला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

error: Content is protected !!