पुणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २९ एप्रिल रोजी होणाऱ्या पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ताधारी आघाडीची शुक्रवारी बैठक घेण्यात आली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार,आमदार राहुल कुल , हर्षवर्धन पाटील , विजय शिवतारे, राजेश पांडे यांच्यासह चारही मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

ना. चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिलला पुण्यात रेसकोर्सवर सभा होणार आहे. या रॅलीसाठी आम्हाला 2 लाख लोकांची अपेक्षा आहे. 29 एप्रिलला पुणे, मावळ, बारामती, शिरूर येथून पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी 29 एप्रिल रोजी पुण्यातील राजभवनात मुक्काम करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमितही रॅलीला उपस्थित राहणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

तसेच आजपर्यंत अशी सभा झाली नाही अशी भव्य सभा घेण्याचे नियोजन आम्ही करत आहोत. कराडमधील सभा संपवून मोदी सोमवारी पुण्यात येणार आहेत. पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यासाठी या रॅलीला दोन लाखांचा जनसमुदाय उपस्थित राहील, चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.