कागल (प्रतिनिधी ) – कागल तालुक्याच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे. जास्तीत जास्त मतांनी आपल्याला संजय मंडलिक यांना निवडून द्यायचे आहे, त्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करावे. कागल तालुक्याच्या स्वाभिमानासाठी प्रा. संजय मंडलिक यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून द्यावे, असे आवाहनही विजय काळे यांनी केले.

कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ रणदिवेवाडी, ता.कागल येथे महायुतीच्या प्रमुख नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थ बैठकीत ते बोलत होते.

यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील म्हणाले, येणाऱ्या ०७ मे रोजी प्राचार्य संजय मंडलिक यांच्या धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून संजय मंडलिक यांना प्रचंड मतांनी विजयी करूया.

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ, सुभाष खोत, सुधाकर खोत, तानाजी खोत, किरण पास्ते सर, कैलास जाधव, प्रकाश भोरे, संभाजी देवमाने, राहुल खोत, राजू पाटील, सुकुमार शिंदे, अभिजीत खोत, महायुतीचे प्रमुख मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.