देवगड एसटी आगारात बीएस -६ दर्जाच्या चार नव्या गाड्या दाखल ; लवकरच आणखी ६ गाड्या मिळणार !

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : देवगड एसटी आगाराला बीएस-६ दर्जाच्या चार एसटी गाड्या प्राप्त झाल्या आहेत. याबाबत भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून देवगड आगारातील बसगाड्यांची भेडसावणारी कमतरता काही प्रमाणात दूर होणार आहे. देवगड व… Continue reading देवगड एसटी आगारात बीएस -६ दर्जाच्या चार नव्या गाड्या दाखल ; लवकरच आणखी ६ गाड्या मिळणार !

अनुदानात वाढ न झाल्याने सार्वजनिक ग्रंथालयांच्या भवितव्याचा प्रश्न ; आ सतेज पाटील यांची लक्षवेधी सूचना

कोल्हापूर( प्रतिनिधी ) : राज्यात १२५०० पेक्षा अधिक सार्वजनिक ग्रंथालय सुरू असून गेल्या अनेक वर्षात त्यांना मिळणा-या अनुदानात वाढ न झाल्याने या ग्रंथालयांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर काँग्रेसचे विधानपरिषदेतले गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली. सार्वजनिक ग्रंथालयांच्या प्रति उदासिनता असल्यामुळे दिवसेंदिवस ही चळवळ खुंटत चालली असल्याने याबाबत राज्य शासनाने… Continue reading अनुदानात वाढ न झाल्याने सार्वजनिक ग्रंथालयांच्या भवितव्याचा प्रश्न ; आ सतेज पाटील यांची लक्षवेधी सूचना

बुकीचालकाचा पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न ; कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कळे प्रतिनिधी : पोलिस वारंवार जुगाराच्या केसेस टाकत असतात म्हणून पोलिस ठाण्याच्या आवारात आत्महत्या करणारा सचिन विनायक खवळे (रा. काऊरवाडी ता. पन्हाळा ) यास कळे पोलिसांनी ताब्यात घेतले असून सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याबाबत पोलिसांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी, सचिन खवळे मटका घेत असतो दरवेळी तो पोलिसांनी मटका घेताना… Continue reading बुकीचालकाचा पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न ; कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गोकुळ मार्फत राष्ट्रमाता जिजाऊ रथयात्रेचे स्वागत..!

कोल्‍हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाच्या (गोकुळ) वतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात समता, बुंधता प्रस्तापित करण्यासाठी सर्व जातीधर्माच्या लोकांना एकतेच्या सूत्रात जोडण्यासाठी जिजाऊ रथ १८ ते १ मे या कालावधीत भोसलेगडी, वेरुळ ते लाल महाल, पुणे असा राज्यस्तरीय समाज जोडो अभियान राज्यस्तरीय जिजाऊ रथ यात्रा सुरू झाली आहे आज राष्ट्रमाता जिजाऊ रथ… Continue reading गोकुळ मार्फत राष्ट्रमाता जिजाऊ रथयात्रेचे स्वागत..!

मुलींना सक्षम – आरोग्यदायी होण्यासाठी एचपीव्ही लसीकरणाने कॅन्सरमुक्तीसाठी प्रयत्न करूया : मंत्री हसन मुश्रीफ

गडहिंग्लज ( प्रतिनिधी ) : जिल्ह्यातील 9 वर्षे पूर्ण झालेल्या मुली ते अविवाहित 26 वर्षापर्यंतच्या मुलींना एचपीव्ही लसीकरण गरजेचे आहे. तोंडाचा, स्तन व गर्भाशय पिशवीचा कर्करोग रोगाचे प्रमाण अधिक आहे. एचपीव्ही लसीकरणाने मुलींना सक्षम व आरोग्यदायी कॅन्सरमुक्तीसाठी प्रयत्न करूया, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. गडहिंग्लज नगरपरिषदेच्या छत्रपती शाहू सभागृहात आयोजित एचपीव्ही(HPV)… Continue reading मुलींना सक्षम – आरोग्यदायी होण्यासाठी एचपीव्ही लसीकरणाने कॅन्सरमुक्तीसाठी प्रयत्न करूया : मंत्री हसन मुश्रीफ

महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : महावितरणला शनिवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळातर्फे (सीबीआयपी) सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी वीज वितरण कंपनी म्हणून गौरविण्यात आले. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर उपस्थित होते. महावितरणच्या गौरवाबद्दल अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस… Continue reading महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार

सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार वीजबिल भरणा केंद्रे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर परिमंडल अंतर्गत महावितरणला पुढील ३१ मार्च अखेर ८० कोटी ९० लाख वसूल करायचे आहेत. त्यासाठी महावितरणने मोहीम तीव्र केली असून वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. ३१ मार्च अखेर सर्व सुट्टीच्या दिवशी ही वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांनी चालू तसेच थकीत वीजबिल… Continue reading सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार वीजबिल भरणा केंद्रे

भगवान महावीर अध्यासनासाठी डॉ. खणे यांच्याकडून एक लाखाची देणगी

कोल्हापूर( प्रतिनिधी ) : शिवाजी विद्यापीठाचे माजी इतिहास अधिविभाग प्रमुख तथा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. बी. डी. खणे यांनी काल (दि. २०) भगवान महावीर अध्यासनासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली. भगवान महावीर अध्यासनाच्या नूतन प्रस्तावित इमारतीसाठी एक लाख रुपयांच्या दातृत्वनिधीचा धनादेश डॉ. बी.डी. खणे यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे काल सायंकाळी सुपूर्द… Continue reading भगवान महावीर अध्यासनासाठी डॉ. खणे यांच्याकडून एक लाखाची देणगी

खासदार धनंजय महाडिक यांची नामदार नितीन गडकरी यांच्याकडं केली ‘ही’ मागणी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेतली. ५० अश्वशक्तीवरील ट्रॅक्टरच्या नोंदणीसाठी घातलेली महाराष्ट्रातील एकतर्फी बंदी उठवावी आणि शेतकर्‍यांसह ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. अजुनही कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या अनेक भागात, भारत तीन ए मानांकनाचे ५०… Continue reading खासदार धनंजय महाडिक यांची नामदार नितीन गडकरी यांच्याकडं केली ‘ही’ मागणी

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीतर्फे शनिवारी ‘अर्थ अवर’चे आयोजन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागच्यावतीने शनिवारी (दि. २२) ‘अर्थ अवर’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या दिवशी रात्री १ तास विजेची उपकरणे बंद ठेवून वीज बचत व पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला… Continue reading डी. वाय. पाटील अभियांत्रिकीतर्फे शनिवारी ‘अर्थ अवर’चे आयोजन

error: Content is protected !!