इस्लामपुर ( प्रतिनिधी ) – राज्यातील व केंद्रातील महायुतीच्या सरकारने ईश्वरपूर शहरासाठी ३३८ कोटीचा विकास निधी दिला आहे. यापुर्वीच्या कोणत्याही खासदारांने शहराला इतका निधी दिला नसुन भविष्यकाळात ईश्वरपुरचा कायापालट करण्यासाठी पुन्हा प्रभू श्री रामचंद्राच्या धनुष्यबाणाला मताधिक्य द्या असे आवाहन खास. धैर्यशील माने यांनी ईश्वरपुर येथील संवाद बैठकीत बोलताना केले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले, ईश्वरपुर येथे भुयारी गटर्ससाठी ७८ कोटी व रस्ते गटर्स व इतर विकासकामे ५४ कोटी रुपयांची पूर्ण झाली आहेत . भाजी मार्केट इमारतीसाठी ५६ कोटी व नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी १५ कोटी रुपये मंजुर झाले असून सध्या निविदा प्रक्रिया सुरु आहे . विशेष बाब म्हणून शहराला चोवीस तास पाणी मिळावे . या उद्देशाने १३५ कोटी रुपये खर्चाची नवीन पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. या सर्वच विकास कामांमुळे शहराचा चेहरा मोहरा बदलणार असुन भविष्यकाळात आणखीन विकास कामांचा डोंगर उभा करायचा आहे. सांगली- पेठ नाक्याच्या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करून ८०० कोटी रुपये मंजुर करून सध्या काम प्रगती पथावर आहे