कागल ( प्रतिनिधी ) – पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जगभरात देशाचा नावलौकिक वाढवला आहे. काँग्रेस आघाडी अंतर्गत कलहाने ग्रासली असून एकमेकांना पाडण्याचे काम ती करत आहे. त्यामुळे देशाला भक्कम नेतृत्व द्यायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात भक्कम करण्यासाठी संजय मंडलिक यांना मतदान करा. असे आवाहन यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील बापू यांनी केले.

कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सावर्डे खुर्द, ता.कागल येथे महायुतीच्या प्रमुख नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थ बैठकीत ते बोलत होते.

यावेळी मनोज फराटे म्हणाले, येणाऱ्या ०७ मे रोजी प्राचार्य संजय मंडलिक यांच्या धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून संजय मंडलिक यांना प्रचंड मतांनी विजयी करूया.

कु.संस्कार कृष्णांत मालवेकर यांची जवहार नवोदय विद्यालय, कागल मध्ये निवड झाल्याबद्दल युवा नेते नविद मुश्रीफ साहेब यांनी पुष्पहार घालून सत्कार केला.

यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ, सागर मालवेकर, दत्तात्रय मालवेकर सर, यशवंत गुरव, प्रकाश भिऊंगडे, महादेव माळवेकर, भगवान मालवेकर, के. एम. शिंदे, गंगाराम केरबा मालवेकर, बाबुराव मालवेकर, आनंदा ढाफळे, आर. के. पसारे, भिकाजी केरबा मालवेकर, यशवंत तुरंबेकर, आर.एन. पाटील, भिकाजी कदम, रंगराव कांबळे, पांडुरंग कदम, महादेव तुरंबेकर, प्रवीण मालवेकर, संजू मालवेकर, परसू देवडकर, महायुतीचे प्रमुख मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.