टोप ( प्रतिनिधी ) देशातील हुकूमशाही मोडीत काढून लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा. असे आव्हान हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी केले. ते कासारवाडी येथील प्रचार दौर्यावेळी बोलत होते.

हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव ,चावरे, मनपाडळे, पाडळी, अंबपवाडी , कासारवाडी येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा प्रचार दौरा केला. यावेळी माजी आमदार सुजित मिंणचेकर म्हणाले की ही निवडणूक मतदारानी हातात घेतली असून प्रत्येक गावात महाविकास आघाडीला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, शिवसेना उपतालुकाप्रमुख बाजीराव पाटील, शिवसेना शाखाध्यक्ष विलास खोत, सरपंच अच्युत खोत, अंबपवाडी शाखाप्रमुख सागर चोपडे, ॲड. राजवर्धन पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.