कोल्हापूर( प्रतिनिधी ) : मंगळवार पेठ आणि मंगळवार पेठेतील नागरिक हिंदुत्वाला मानणारे आहेत. मंगळवार पेठेने सर्वच निवडणुकांमध्ये आपले बहुमोल मत शिवसेनेच्या पारड्यात टाकले आहे. मंगळवार पेठेचा सर्वांगीण विकास ही शिवसेनेची जबाबदारी असून, येथील मुलभूत सोई सुविधांसह तालीम संस्थांच्या बांधकामाला निधी देवून शिवसेनेने विकास कार्याचे पर्व अखंडीत सुरु ठेवले आहे. सत्ता असो वा नसो समाजकार्याच्या माध्यमातून लोकांची कामे करा ही शिकवण शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समाजकार्यासह विकास कामांचा आलेख उंचावत चालला आहे. त्यामुळे मंगळवार पेठेची ताकद शिवसेनेच्या पाठीशी उभी असून, महायुती उमेदवार खासदार संजय मंडलिक यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.

महायुतीचे शिवसेना उमेदवार खास.प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मंगळवार पेठेतील प्रॅक्टीस क्लब चौकात मिसळ पे चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, ही निवडणूक देशाची ध्येयधोरणे ठरवणारी आहे. गत निवडणुकीत आपण दिलेले मत हे देशहितासाठी घेतलेल्या निर्णयात सार्थकी लागले आहे. ५०० वर्षे प्रलंबित असलेले प्रभू श्री राम मंदीर, ३७० कलम रद्द, सी.सी.ए.कायदा अशा प्रकारचे ऐतिहासिक निर्णय होताना आपण निवडणून दिलेले खासदार यात सामील होते. देशाचे ध्येयधोरण ठरवताना आपले मत उपयोगी पडत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन.डी.ए चे सरकार पुन्हा सत्तेत येईल यात काडीमात्र शंका नाही. या सत्तेत कोल्हापुरातून शिवसेनेचे प्रा.संजय मंडलिक ही सहभागी होतील हा निर्णय जनतेने घेतला आहे. पराभव समोर दिसू लागल्यानेच देशहिताचे निर्णय, विकासाचे मुद्दे सोडून विरोधकांकडून खालच्या स्तराचे राजकरण सुरु करण्यात आले आहे. परंतु, जनता सुज्ञ असून विरोधकांच्या भावनिक प्रचाराला साद न देता विकासाच्या दृष्टीला निवडणून देण्याकरिता प्रा.संजय मंडलिक यांना विजयी करेल, असा विशास व्यक्त केला.

यावेळी संतोष महाडीक, मिलिंद गुरव, विनायक पाटील, नंदू सुतार, कुणाल शिंदे, गणेश रांगणेकर, संतोष माळी, मा.नगरसेवक बाबा पार्टे, रणजीत जाधव, प्रशांत जाधव, अवधूत सावेकर, सागर माळी, शुभम मस्कर, अनिल कोळेकर, स्वरूप माळी, अनिल जाधव, मिथुन गवळी, प्रवीण माळी, शिरीष पाटील, अक्षय कोरे, केशव पांडे, अमित गवळी, रणजीत सासणे, राजेंद्र सुतार, अनिल गायकवाड, महादेव जाधव, संतोष माळी, साईनाथ मोरे, तुषार शिंदे, ओंकार कोळेकर, केदार जाधव, शैलेश पाटील आदी भागातील नागरिक, महिला, तालीम संस्था आणि मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.