कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाराज यांचे थेट वारसदार आणि पणतू राजे राजवर्धन कदमबांडे मी आज त्यांच्या पूर्वजांच्या पुतळ्यांना अभिवादन करून पुष्पांजली अर्पण केले. युतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी ते कोल्हापूरमध्ये आले होते.

राजे कदमबांडे यांनी करवीर संस्थांच्या संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी दसरा चौकातील राजर्षि शाहू महाराज यांच्या पुतळ्यापुढे नतमस्तक झाले आणि आपल्या कोल्हापूर संस्थानातील वारसाला उजाळा दिला.

यावेळी सत्यजित कदम, अरुण निंबाळकर, रणजीतसिंह फत्तेसिंह चव्हाण हिंम्मत बहाद्दूर, नंदकुमार घोरपडे तेजसिंह जाधव, संग्राम पाटील, निरंजन शिंदे,, किरण शिंदे, नंदकुमार सूर्यवंशी आदी उपस्थित होते.