शक्तीपीठ महामार्गविरोधात आझाद मैदानावर मोर्चा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा मोर्चा उद्या बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावर काढण्यात येणार आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या पुढकाराने होत असलेल्या या मोर्चात दहा हजारांहून अधिक बाधित शेतकरी सामील होणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून चार हजार शेतकरी काल (सोमवार) सायंकाळीच मुंबईकडे रवाना झाले. आझाद मैदानात… Continue reading शक्तीपीठ महामार्गविरोधात आझाद मैदानावर मोर्चा…

‘हे’ आजार रोखण्याबाबत कोणती उपाययोजना केली..? : आ. सतेज पाटलांचा आरोग्यमंत्र्यांना सवाल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एचएमपीव्ही आणि जीबीएस या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनस्तरावरून कोणती उपाययोजना केली आहे. असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जीबीएस आणि एचएमपीव्ही यासारख्या संसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथक कार्यरत केल्याची माहिती दिली. आ. पाटील यांनी, जीबीएस या… Continue reading ‘हे’ आजार रोखण्याबाबत कोणती उपाययोजना केली..? : आ. सतेज पाटलांचा आरोग्यमंत्र्यांना सवाल

शिरोळ नगरपरिषदेच्या थकीत घर,पाणीपट्टी वसुलीमध्ये तफावत : पृथ्वीराज यादव

शिरोळ (प्रतिनिधी) : लेखा परीक्षण अहवालामध्ये शिरोळ नगरपरिषदेच्या घरफाळा, पाणीपट्टी कर वसूलीच्या थकबाकीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असलेने चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी. या मागणीसाठी पृथ्वीराजसिंह यादव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांना आज घेराव घातला. यावेळी निशिकांत प्रचंडराव यांनी, थकीत कराच्या रकमेची चौकशी होऊन दोषी व्यक्तींवर कारवाई होईपर्यंत शिरोळमधील मालमत्ताधारकांची कर आणि… Continue reading शिरोळ नगरपरिषदेच्या थकीत घर,पाणीपट्टी वसुलीमध्ये तफावत : पृथ्वीराज यादव

युवा सेनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना बलिदान दिनी अभिवादन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन. यानिमित्त युवा सेना कोल्हापूरच्या वतीने पापाची तिकटी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या अतुलनीय पराक्रमाच्या जोरावर वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी औरंगजेबाच्या नजरेला नजर मिळवत आपल्या पराक्रम आणि धाडसाची चुणूक दाखवून दिली होती. आपल्या… Continue reading युवा सेनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना बलिदान दिनी अभिवादन…

वाकुर्डे बुद्रुक योजनेतील विविध प्रश्ना संदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न..

सांगली ( प्रतिनिधी ) : वाकुर्डे बुद्रुक योजनेतील विविध प्रश्नसंदर्भात मंत्रालय येथे राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते. वाकुर्डे बुद्रुक योजनेमधील रेड कालव्याची गळती प्रतिबंधक कामांची प्रशासकीय मान्यता घेण्यासाठीचा प्रस्ताव शासनास सादर करावा तसेच सदर… Continue reading वाकुर्डे बुद्रुक योजनेतील विविध प्रश्ना संदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न..

पालघर जिल्ह्यातील रोहयो मजूरांच्या थकबाकीचा प्रश्न विधानसभेत अजितदादांच्या उत्तराने चुटकीसरशी सुटला

मुंबई : पालघर जिल्ह्याच्या वाडा, जव्हार, विक्रमगड तालुक्यातील रोजगार हमी योजनेवरील 4 हजार मजुर थकीत मजूरीची रक्कम मिळावी म्हणून तहसिल कार्यालयासमोर सकाळपासून थांबून असल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत संवेदनशीलतेने दखल घेऊन संबंधित मजुरांना त्यांची 45कोटींची थकबाकी होळी सणापूर्वी तात्काळ वितरीत करण्यात येईल, अशी घोषणा केली. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या… Continue reading पालघर जिल्ह्यातील रोहयो मजूरांच्या थकबाकीचा प्रश्न विधानसभेत अजितदादांच्या उत्तराने चुटकीसरशी सुटला

महायुती सरकारचा अर्थसंकल्पात धनगर समाजावर अन्याय का ..? : आण्णासाहेब डांगे

मुंबई ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्रातील अत्यंत मागासलेल्या आणि राज्यातील लक्षणीय लोकसंख्या असलेला धनगर समाज आणि तत्सम संबंधित बाबींकडे शासनाचे संपूर्ण दुर्लक्ष असणारा हा दुर्दैवी अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी ज्येष्ट मंत्री, धनगर समाज महासंघाचे संस्थापक, मार्गदर्शक डॉ. आण्णासाहेब डांगे यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्ताने देशभर त्यांच्या कर्तुत्वाचे गुणगान होत… Continue reading महायुती सरकारचा अर्थसंकल्पात धनगर समाजावर अन्याय का ..? : आण्णासाहेब डांगे

धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करु पाहणाऱ्या मंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी तंबी द्यावी: नाना पटोले

मुंबई: कोणते मटन कोणत्या दुकानातून व कोणाकडून घ्यावे अशा प्रकारचे फतवे मंत्री काढत असतील तर ते योग्य नाही. मंत्रीच अशा पद्धतीने धर्माधर्मात वाद निर्माण करण्याचे काम करत आहेत, यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व ते महाराष्ट्रासाठी योग्य नाही. दुकानदारांना सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार मंत्र्याला कोणी दिला? हा नवीन धंदा स्वतःचे खिसे भरून धार्मिक तेढ निर्माण… Continue reading धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करु पाहणाऱ्या मंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी तंबी द्यावी: नाना पटोले

‘या’साठी आता सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक: उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई – राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बिअर किंवा दारुचे दुकान सुरु करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक राहील. सोसायटीच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’शिवाय राज्यात नवीन बिअर शॉपी किंवा दारु दुकान सुरु करता येणार नाही, अशी रोखठोक आणि स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केली. दरम्यान अजित पवार यांच्या घोषणेमुळे… Continue reading ‘या’साठी आता सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक: उपमुख्यमंत्री अजित पवार

कासारवाडी येथे पलूसच्या व्यक्तीचा विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू

टोप ( प्रतिनिधी ) : सादळे मादळे डोंगराच्या पायथ्या शेजारी कासारवाडी गावच्या हद्दीत पलुस येथील व्यक्तीने विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू झाला . मृत्यूचे कारण अस्पष्ट . मयत व्यक्तीचे नाव शरद नामदेव गायकवाड ( वय ४८ रा शिवदत्त काॅलणी पलुस जि सांगली) आहे. शरद गायकवाड हे अज्ञात कारणासाठी कासारवाडी येथील काॅलेज शेजारी येवून त्याने विषारी… Continue reading कासारवाडी येथे पलूसच्या व्यक्तीचा विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू

error: Content is protected !!