कागल ( प्रतिनिधी ) – ही निवडणूक एका व्यक्तीची नाही, एका मतदारसंघाचीही नाही तर ही निवडणूक देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी आहे. ही निवडणूक नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणारी निवडणूक आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार संजय मंडलिकांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी केले.कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सोनाळी खुर्द, ता.कागल येथे महायुतीच्या प्रमुख नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थ बैठकीत ते बोलत होते.

सुनिलराज सुर्यवंशी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भारतीय अर्थव्यवस्था केवळ मजबूत केली नाही तर ११ व्या क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर आणली. आता भारताला तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करायचे आहेत.

मनोज फराकटे म्हणाले, येणाऱ्या ०७ मे रोजी प्राचार्य संजय मंडलिक यांच्या धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून संजय मंडलिक यांना प्रचंड मतांनी विजयी करा.

यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील (बापू), गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ, ईगल प्रभावळकर, डी.एम. चौगले, सिताराम लोंढे, दत्ता पाटील केनवडेकर, यशवंत गुरव, प्रकाश भिऊंगडे, पी.व्ही. पाटील सर, विनायक रेडेकर, बाळासो कपले, रणजित शेणवी, नामदेव भोसले, सागर चौगले, उत्तम बचाटे, अशोक बापू चौगले, यशवंत पाटील, के. डी. पाटील, धनाजी पोवार, महायुतीचे प्रमुख मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.