मुंबई – अभिनेत्री मलायका अरोरा ही बॉलीवूड मधले एक नामवंत नाव आहे. तिने अनेक सिनेमामध्ये काम केलं आहे. तसेच अनेक सुपरहिट गाण्यामध्ये ही ती झळकली आहे. ती एक उत्तम अभिनेत्री सोबतच ती एक उत्तम डान्सर सुद्धा आहे. अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूर मलायका अरोराच्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. मलायकाचा अरबाज खान सोबत घटस्फोट झाल्यापासून आज तिच्या अटींवर आयुष्य जगत आहे. आज ती जरी बॉलिवूड सिनेमासृष्टीतले नामवंत नाव असले तरी एकेकाळी या अभिनेत्रीला अनेक संकटांचा सामना करावा लागला होता.एका कार्यक्रमात मलायका हिने तिच्या लहानपणी घडलेल्या मोठ्या घटनेबद्दल सांगितलं होतं. मलायका हिच्या लहानपणी घडलेली ‘ती’ घटना फार कमी लोकांना माहिती आहे

काय म्हणाली मलायका अरोरा..?

‘इंडियाज बेस्ट डान्सर’ रिऍलिटी शोमध्ये मलायका जजच्या भूमिकेत होती. शोच्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. लहान असताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला असल्याचं खुद्द अभिनेत्रीने सांगितलं होतं. अभिनेत्री फक्त 11 वर्षांची असताना वडिलांनी कुटुंबाची साथ सोडली होती.

मलायका म्हणाली होती, ‘मी फक्त 11 वर्षांची होती. तेव्हा वडिलांनी माझ्या आईची साथ सोडली. एकट्या आईने माझा आणि बहीण अमृता हिचा सांभाळ केला आहे. ती वेळ आमच्यासाठी फार कठीण होती. अनेक अडचणींचा सामना आम्ही केला आहे. ’ जुने क्षण आठवत अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी देखील आलं

अर्जुन कपूर मलायका अरोराच्या लग्नाच्या चर्चां

अभिनेत्रींच्या आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूर मलायका अरोराच्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला. अर्जुन कपूर आणि मलायका २०१८ पासून व एकमेकांसोबत नात्यात आहेत. योग्य वेळ नक्की लग्न करेल…’ असं वक्तव्य देखील अभिनेत्रीने केलं होतं. दोघांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.