सध्या वातावरणातील उकाडा प्रचंड वाढला आहे. सध्या देशासह राज्यभरात तापमानात चांगलीच वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आपण घरी आल्या आल्या थंड पाणी पितो. थंड पाणी पिल्याने आपल्याला थंडावा जाणवतो. उन्हाळ्यात खास करून उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लोक थंडगार पाणी पितात. आपल्यापैकी अनेकांना कडक उन्हातून आल्यावर लगेच फ्रीजमधून बाटली काढून पाणी पिण्याची सवय असेल. हे थंडगार पाणी प्यायल्यामुळे शरीराला आराम मिळतो आणि उष्णता दूर होते.पण तुम्हाला माहिती आहे का थंड पाणी पिणे आरोग्यसाठी हानिकारक होऊ शकते..!

थंड पाणी प्यायल्यामुळे, तुम्हाला मिळणारा आराम हा तात्पुरता असतो. परंतु, जर तुम्ही थंडगार पाणी जास्त प्रमाणात पित असाल तर वेळीच सावध व्हा. कारण, सतत थंडगार पाणी पिणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. या थंडगार पाण्यामुळे तुमचे वजन तर वाढतेच शिवाय, हृदयालाही हानी पोहचू शकते. हे थंडगार पाणी प्यायल्यामुळे आरोग्याचे काय नुकसान होते ? त्याबद्दल जाणून घेऊयात.

उन्हातून बाहेर पडल्यावर लगेच थंड पाणी पिल्याचे परिणाम

पचनावर परिणाम

शरीर कोणतेही पदार्थ आपल्या तापमानात आणते, जे ते पुढील पचनासाठी पाठवते, परंतु अत्यंत कमी तापमानाच्या वस्तूंचे सेवन केल्याने, शरीर आपल्या तापमानानुसार ते करू लागते, त्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि अपचनाची समस्या उद्भवते. पोटात थंड पाण्याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो. संशोधनानुसार, थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात.

घसा खवखवणे

घसा दुखत असेल किंवा आवाजात बदल झाला असेल तेव्हा थंड पाणी प्यायले असेल असे अनेकदा वडील सांगतात. हे देखील खरे आहे, थंड पाणी प्यायल्याने घसा खवखवतो. फ्रीजमध्ये बाहेर काढल्यानंतर थंड पाणी प्यायल्यानंतर असा त्रास होणे सामान्य गोष्ट आहे. दुसरीकडे, जेवणानंतर थंड पाणी प्यायल्यास, श्लेष्मा तयार होण्यास सुरवात होते आणि वायुमार्ग अवरोधित होतात. यामुळे घसा खवखवणे, श्लेष्मा, सर्दी आणि घशात सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

हृदयगती वर परिणाम

थंड पाण्याचे सेवन केल्याने तुमच्या शरीराची हृदय गती देखील कमी होऊ शकते. एका अभ्यासानुसार, फ्रीजचे अधिक थंड पाणी प्यायल्याने दहाव्या क्रॅनियल नर्व्ह (व्हॅगस नर्व्ह) उत्तेजित होतात. मज्जातंतू शरीराच्या अनैच्छिक कार्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदार आहे. कमी तापमानाच्या पाण्याचा परिणाम थेट वॅगस नर्व्हवर होतो, ज्यामुळे हृदय गती कमी होते.

डोकेदुखी समस्या

उन्हातून आल्यानंतर लगेचच खूप थंड पाणी किंवा बर्फाचे पाणी प्यायल्यास ब्रेन फ्रीझ होऊ शकतो. थंड पाण्याचे सेवन केल्याने तुमच्या मणक्यातील अनेक नसा थंड होऊ शकतात, ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि डोकेदुखी होऊ शकते. ही स्थिती सायनसच्या समस्यांनी ग्रस्त लोकांसाठी त्रास वाढवू शकते.