कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गवसे येथील आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुक निकाल नुकताच लागला असून, सभासदांनी नामदार हसन मुश्रीफ यांच्याबाजूने कौल देत, साखर कारखाना निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या रवळनाथ विकास आघाडीला 19 जागांवर विजय मिळवत आला आहे. तर विरोधी आघाडीला केवळ दोन जागा मिळवता आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर रवळनाथ विकास आघाडीचे नेते नामदार हसन मुश्रीफ यांनी याबाबत प्रतिक्रीया देताना म्हटलं आहे की, आजरा सहकारी साखर कारखाना हे स्वर्गीय वसंतराव देसाई यांनी मोठ्या कष्टाने उभारलेले शेतकऱ्यांच्या श्रमाचे पवित्र मंदिर आहे. त्यांच्या आणि सभासद शेतकऱ्यांच्या या भावनेचे पावित्र्य आम्ही सदैव जपू असे ते म्हणाले.

कारखान्याच्या या निवडणुकीमध्ये श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीच्या या ऐतिहासिक विजयासाठी जे -जे कार्यकर्ते, हितचिंतक आणि सभासद शेतकरी अहोरात्र राबले. या विजयासाठी त्यांनी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी केले. तसेच; असंख्य ज्ञात -अज्ञातांनीही फार मोठे सहकार्य केले. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार ! असं ही म्हटलं आहे.