टोप ( प्रतिनिधी ) पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकची मोटरसायकला धडक बसून मोटरसायकल स्वार जागीच ठार हा अपघात शिये फाटा येथे धनराज हॉटेलसमोर आज सकाळी 8 वाजण्यासुमार झाला असून, या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे.

या अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव सतिश पांडुरंग गावडे ( वय 47 रा वारणा कोडोली ता पन्हाळा ) असे असून सतिश हा औद्योगिक वसाहतीमधील मंत्री मेटॅलिक्स कंपनीत काम करत होता. तो आज सकाळी शिये फाटा येथे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच 09 बी जी 9702 ने जात असताना धनराज हॉटेलसमोर आला हता.

दरम्यान पुणेहून बेंगलोरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम. एच. 09 जी. जी. 1188 ने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. या अपघातामुळे हायवेवर काही काळ वाहतूकीची कोंडी झाली होती.