कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कसबा बावडा येथील एसटीपी प्रकल्प लोकार्पण सोहळ्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त आडसूळ यांची शहरातील निधी देऊनही रखडलेल्या विकास कामावरून चांगलीच खरडपट्टी केली. लवकरात लवकर काम पूर्ण करा अन्यथा अतिरिक्त आयुक्त आडसूळ यांना बदला.” अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

पुढे बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले महापालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना आयुक्त म्हणून काम करण्यात स्वारस्य आहे की नाही मला समजत नाही. कारण त्यांना चार चार वेळा फोन करुन सांगितलं तरी त्यांच्याकडून योग्य़ त्या पद्धतीने कामे होते नाहीत. असे ही ते म्हणाले. आज नागरिक समस्यांनी वैतागले आहेत. वर्तमानपत्र आग ओखत आहेत. पालकमंत्र्यांच्यावर हप्त्याचे आरोप केले जात आहेत. तरी ही शासकीय यंत्रणा शांत असेल तर मला असे बोलावे लागल्याचं ही ते संप्तत होत म्हणाले.

पुढे बोलताना मुश्रीफ म्हणाले लोकांच्याकडून विचारणा होत आहेत. फंड मंजूर असताना रस्त्याची कामे पूर्ण का झाली नाहीत ? त्यामुळे आयुक्त मॅडम यांनी यामध्ये लक्ष घालून काम केलं पाहीजे. लवकरात लवकर काम पूर्ण करा अन्यथा अतिरिक्त आयुक्त आडसूळ यांना बदला.” अशा सूचना देताना पालकमंत्र्यांनी अडसूळ हे ग्रामविकास विभागात असताना त्यांना मी नगरविकास विभागात आणल्याची आठवण करून दिली.