कोरे अभियांत्रिकीवर युरेका-जिज्ञासा 2 के 24 या स्पर्धेचे आयोजन

वारणानगर ( प्रतिनिधी ) अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्यामधील नाविन्यपूर्ण कल्पकतेला चालना मिळावी व विज्ञान विषयक अविष्कार सादर करण्याची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त) महाविद्यालय गेली 37 वर्षे “युरेका -जिज्ञासा’ नावाची राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प प्रदर्शन व शोध निबंध स्पर्धा आयोजित करत असते. महाविद्यालयातील विद्यार्थी,प्राध्यापक, विभागप्रमुख यांच्या… Continue reading कोरे अभियांत्रिकीवर युरेका-जिज्ञासा 2 के 24 या स्पर्धेचे आयोजन

अष्टपैलू डॉ. बाबासाहेब आंबेडकर

असित बनगे : कोल्हापूर सोनियाची उगवली सकाळ उगवली सकाळ, जन्मास आले भीमबाळ खरचं आजचा दिवस 14 एप्रिल हा समस्त दीन दलितांसाठी,शोषित वर्गासाठी, हजारो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या वंचितांसाठी सोन्याचाच दिवस होता. कारण त्यांच्या उद्धारकाने आज जन्म घेतला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14  एप्रिल 1891  रोजी महू या गावी झाला. सुभेदार रामजी हे बाबासाहेबांचे वडील तर भीमाबाई… Continue reading अष्टपैलू डॉ. बाबासाहेब आंबेडकर

‘राम मंदिरच का ? या पुस्तकाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन  

पुणे ( प्रतिनिधी ) सच्चिदानंद शेवडे आणि डॉ. परिक्षित शेवडे लिखित ‘राम मंदिरच का ?’ या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली. यावेळी ते बोलताना म्हणाले की, प्रभू श्रीरामांनी आपल्या संपूर्ण जीवनातून मानवाने त्याचं आयुष्य कसं जगावं ? म्हणजेच डूज ॲंड… Continue reading ‘राम मंदिरच का ? या पुस्तकाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन  

भारतीय सैन्य दलात अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण; सहभागी होण्याचं केलं आवाहन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंम्बाईनड डिफेन्स सर्व्हिस (CDS) परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे दिनांक 1 फेब्रुवारी ते 15 एप्रिल 2024 या कालावधीत CDS कोर्स क्र. 62 आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील… Continue reading भारतीय सैन्य दलात अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण; सहभागी होण्याचं केलं आवाहन

‘Animal’ चा Box Office वर धूमाकूळ; रणबीरने 3 दिवसात तोडले ‘हे’ रेकॉर्ड

मुंबई ( वृत्तसंस्था ) रणबीर कपूरचा ‘अनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसात भारतात 200 कोटींची कमाई केली आहे. आता यावर्षी बंपर कमाई करणारा पठाण जवान आणि गदर 2 ला मागे टाकण्याच्या शर्यतीत तो आहे. अॅनिमल मूव्हीने देशाच्या विविध भागात कमाईचे अनेक विक्रम केले आहेत. या चित्रपटाने गुजरात… Continue reading ‘Animal’ चा Box Office वर धूमाकूळ; रणबीरने 3 दिवसात तोडले ‘हे’ रेकॉर्ड

जातीव्यवस्था नष्ट करण्यात आलेले अपयश चिंताजनक : डॉ. थोरात

सावित्रीबाई फुले यांच्याविषयी रिटा गुप्ता यांच्या पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याने शूद्रातिशूद्रांना शिकवून जातीव्यवस्थेवर प्रखर आघात केला; मात्र आज दोनशे वर्षे उलटल्यानंतरही जातीव्यवस्था उद्ध्वस्त करण्यात आपण यशस्वी झालेलो नाही, हे चिंताजनक आहे, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत व अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंतराव थोरात यांनी येथे व्यक्त केली. ‘सावित्रीबाई फुले: हर… Continue reading जातीव्यवस्था नष्ट करण्यात आलेले अपयश चिंताजनक : डॉ. थोरात

ग्रंथालय अनुदान विषयक कामकाज ऑनलाइन करणार- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणालीचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालय यांनी संगणकाधारीत “ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणाली (Library Grant Management System) विकसीत करण्यात आली आहे. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान… Continue reading ग्रंथालय अनुदान विषयक कामकाज ऑनलाइन करणार- मंत्री चंद्रकांत पाटील

पाचव्या धम्मविचार साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी संजय आवटे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि पत्रकार संजय आवटे यांची पाचव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. हे संमेलन रविवार दि. 29 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे पार पडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाचवे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन आयोजित करण्यात आले आहे. धम्म भवन चॅरिटेबल… Continue reading पाचव्या धम्मविचार साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी संजय आवटे

फुले-आंबेडकरी विचारांतच समग्र समानतेची बीजे : डॉ. वंदना महाजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : फुले-आंबेडकरी विचारांतच स्त्री-पुरूषादी समग्र समानतेची बीजे रुजलेली आहेत, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या मराठी अधिविभाग प्रमुख तथा साहित्यिक डॉ. वंदना महाजन यांनी येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे डॉ. दीपा श्रावस्ती लिखित ‘आंबेडकरी चळवळीतील स्त्रिया’ (विमेन इन डॉ. आंबेडकर्स मूव्हमेंट) या संशोधन ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या… Continue reading फुले-आंबेडकरी विचारांतच समग्र समानतेची बीजे : डॉ. वंदना महाजन

कुरुंदवाड येथे २१ डिसेंबरपासून जागर व्याख्यानमाला

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : येथील साधना मंडळ व राष्ट्रसेवा दलाच्या वतीने राष्ट्र सेवा दल दिनानिमित्त २१ ते ३० डिसेंबरअखेर ३८ व्या जागर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती साधना मंडळाचे अध्यक्ष सदाशिव सुभेदार यांनी पत्रकार बैठकीत दिली. ते म्हणाले, समाजामध्ये वाचन आणि श्रवण संस्कृती वाढावी, या उद्देशाने गेली ३८ वर्षे व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. राज्य… Continue reading कुरुंदवाड येथे २१ डिसेंबरपासून जागर व्याख्यानमाला

error: Content is protected !!