पुणे ( प्रतिनिधी ) सच्चिदानंद शेवडे आणि डॉ. परिक्षित शेवडे लिखित ‘राम मंदिरच का ?’ या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली.

यावेळी ते बोलताना म्हणाले की, प्रभू श्रीरामांनी आपल्या संपूर्ण जीवनातून मानवाने त्याचं आयुष्य कसं जगावं ? म्हणजेच डूज ॲंड डोन्ट्सचा आदर्श घालून दिला. त्यामुळेच प्रभू श्रीरामचंद्रांना ‘मर्यादा पुरुषोत्तम’ असं म्हटलं जातं.


आज अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य-दिव्य असे मंदिर उभारले जात असताना, आपल्या मानबिंदूची पुनर्स्थापना होत आहे. हा आनंद आपण सर्वांनी दिवाळी सारखाच साजरा करावा, असे आवाहन पाटील यांनी उपस्थितांना केले. यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, परशुराम सेवा संघाचे विश्वजीत देशपांडे, डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि डॉ. परिक्षित शेवडे यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते.